Tuesday, September 17, 2024
Home बॉलीवूड स्टेजवरच सर्वांसमोर सलमान खानने इमरान हाश्मीला केलं किस?, सोशल मीडियावर व्हिडिओ तूफान व्हायरल

स्टेजवरच सर्वांसमोर सलमान खानने इमरान हाश्मीला केलं किस?, सोशल मीडियावर व्हिडिओ तूफान व्हायरल

बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खान सध्या त्याच्या ‘टाइगर 3’ चित्रपटाच्या यशाचा आनंद घेत आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 200 कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे. या यशाबद्दल अभिनेता सलमान खान, कतरिना कैफ आणि इमरान हाश्मी मुंबईत एका कार्यक्रमात सहभागी झाले होते. यावेळी कार्यक्रमात एक मजेदार किस्सा घडला.

सलमान खान म्हणाले की, ‘टाइगर 3’ चित्रपटात कतरिना कैफ होती तर थोडा रोमान्स झाला असता. यावर इमरान हाश्मी म्हणाला, “जर मी आतिशची भूमिका केली नसती तर असं झालं असतं.” यावर सलमान खानने इमरान हाश्मीला गंमतीने किस करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी कतरिनासमोर सलमाननं इमरानच्या किसिंग स्टाईलची नक्कल केली. त्याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी मजेशीर कमेंट देखील केल्या आहे. हे पाहून उपस्थितांमध्ये हशा माजला. इमरान हाश्मी म्हणाला की, “सलमान खानसोबत काम करण्याचा अनुभव खूप छान होता. अर्थातच तो आणि मी जास्त एकत्र फिरत नाहीत, पण आम्ही एकमेकांशी खूप चांगले वागतो.”

सलमान खान म्हणाले की, “टाइगर 3″ ला प्रेक्षक आणि चाहत्यांच्या प्रतिसादेने मी खूप खुश आहे! चित्रपटाला चांगली सुरुवात झाली आहे आणि मला आनंद आहे की या फ्रँचायझीचा तिसरा भाग देखील एक यशोगाथा लिहित आहे. टायगर ही एक फ्रँचायझी आहे जी माझ्या हृदयाच्या जवळ आहे. त्यामुळे चित्रपटाला अधिक प्रेम मिळणे हे खरोखरच विशेष आहे. मला आशा आहे की हा चित्रपट जगभरातील प्रेक्षकांचे मनोरंजन करत राहील.”

‘टायगर 3’ बद्दल बोलायचे झाले तर, 12 नोव्हेंबरला रिलीज झालेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 200.65 कोटींची कमाई केली आहे. 44.50 कोटी रुपयांच्या ओपनिंगसह, ‘टायगर 3’ सलमान खानसाठी केवळ दिवाळीची सर्वात मोठी ओपनिंगच नाही तर सुपरस्टारची आतापर्यंतची सर्वात मोठी ओपनिंग ठरली. अलीकडेच सलमान खान म्हणाला की, ‘टायगर 3’ला प्रेक्षक आणि चाहत्यांकडून मिळालेल्या प्रतिसादामुळे मी खूश आहे.

आधिक वाचा-
वाहतूक कोंडीत अडकल्या मिसेस उपमुख्यमंत्री, गाडीत केले ‘ते’ कृत्य, सोशल मीडियावर Video व्हायरल
CWC 2023 Final: ‘टायगर 3’च्या कार्यक्रमात सलमान खान म्हणाल, ‘यंदाचा वर्ल्डकप…’

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा