Friday, April 19, 2024

कोण आहे ती मिस्ट्री गर्ल? जिला पाहून ५६ वर्षीय सलमानचा चेहरा झाला लाल

बॉलिवूडचा हँडसम हंक सलमान खान (Salman Khan) मोस्ट एलिजिबल बॅचलर म्हणून ओळखला जातो. मात्र त्याचे अनेक अफेअर्स नेहमीच चर्चा रंगवत असतात. दबंग खान जेव्हा-जेव्हा प्रेमात पडला, तेव्हा त्याने हे प्रेम फिल्मी दुनियेत उघडपणे व्यक्त केले. आतापर्यंत सलमानचे नाव अनेक सौंदर्यवतींशी जोडले गेले आहे, मात्र त्याने कधी कोणाशी लग्न नाही केले. अशातच सलमान खानचा एक फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तो मिस्ट्री गर्लकडे पाहून हसताना दिसत आहे. अशा परिस्थितीत दबंग खानच्या चाहत्यांना जाणून घ्यायचे आहे की, फोटोमध्ये सलमानकडे प्रेमळ नजरेने पाहणारी ही सुंदरी नक्की आहे तरी कोण?

खरं तर, हा फोटो आत्ताचा नसून बराच जुना आहे. या फोटोमध्ये सलमान खान थिएटरमध्ये दिसत आहे. यासोबतच या फोटोमध्ये एक मिस्ट्री गर्लही दिसत आहे, जी सीटवर बसून सलमानकडे प्रेमळ नजरेने पाहत आहे. खरं तर, सलमान ज्या मिस्ट्री गर्लकडे पाहून हसत आहे, ती इतर कोणी नसून त्याची चाहती आहे. (salman khan looks quite happy with mystery girl in throwback photos)

जेव्हा सलमानचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला, तेव्हा चाहत्यांनी वेगवेगळ्या पद्धतीने कमेंट करण्यास सुरुवात केली. काहींनी ‘ही अभिनेत्री कोण’ असा प्रश्न विचारण्यास सुरुवात केली. तर अनेक यूजर्सनी कमेंट करण्यास सुरुवात केली की, ‘या अभिनेत्रीचे हसणे पाहून सलमान भाई फिदा झाला.’

तसे हा फोटो खूपच सुंदर आहे. दुसरीकडे, जर आपण सलमान खानच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर सलमान खान शेवटचा ‘अंतिम’ चित्रपटात दिसला होता. तो लवकरच त्याची खास मैत्रीण आणि बॉलिवूड अभिनेत्री कॅटरिना कैफसोबत (Katrina Kaif) ‘टायगर ३’मध्ये दिसणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

हे देखील वाचा