यावर्षी सर्वात जास्त गाजलेला आणि सतत चर्चेत आलेला शो म्हणजे ‘बिग बॉस’. यंदाचे या शोचे हे १६ वे पर्व होते. बऱ्याच वर्षांनी बिग बॉस पाहताना आणि बिग बॉसबद्दल बोलताना लोकांना जास्त मजा आली असल्याचे अनेकांनी मान्य केले. बिग बॉस १६ ने प्रेक्षकांचे तुफान मनोरंजन केले. या पर्वाला मिळणारे प्रेक्षकांचे प्रेम पाहून चार आठवड्यांची शोला मुदत वाढ देखील देण्यात आली होती. आज हे पर्व संपूर्ण दोन दिवस झाले असले तरी याबद्दल अजूनही चर्चा होताना दिसत आहे. बिग बॉस १६ चा विजेता कोण होणार हे शो बघत नसलेल्या लोकांना देखील जाणून घ्यायचे होते. एवढी जास्त क्रेझ शोने निर्माण केली होती.
शो जसजसा शेवटाकडे येत होता तसतसे शिव ठाकरे हा शो जिंकणार असे भाकीत वर्तवले जाऊ लागले. अतिशयोक्ती वाटेल मात्र ९० टक्क्यांपेक्षा जास्त लोकांना शिवनेच शो जिंकावा असे वाटत होते. मात्र शिवला एमसी स्टॅनने शेवटच्या क्षणी पछाडत ट्रॉफी हातात घेतली, आणि शिव पहिला रनरअप ठरला. यामुळे त्याचे फॅन्स चांगलेच निराश झाले. त्यांनी बिग बॉसवर टीका देखील केली. असे असूनही शिव निराश झाला नाही. उलट ट्रॉफी मंडळींच्या एका सदस्याकडे आल्याचे समाधान व्यक्त केले. शिव ठाकरेने बिग बॉस शोच्या माध्यमातून अमाप लोकप्रियता आणि प्रसिद्धी तर मिळवली सोबतच लोकांच्या मनात एक पक्के स्थान देखील पटकावले. आज शिव ठाकरेला या शोमुळे पॅन इंडिया ओळख मिळायचे श्रेय जाते त्याच्या अचूक खेळीला. शिवला अनेकदा सलमानच्या रोषाला सामोरे जावे लागले, सलमानकडून त्याचे अनेकदा कौतुक देखील झाले. मात्र त्याने त्याचा गेमप्लॅन कधीच बदलला नाही. तो त्याच्या पद्धतीने खेळत राहिला आणि आज एमसी स्टॅनपेक्षा अधिक लोकप्रियता शिवची आहे.
View this post on Instagram
मराठी बिग बॉस जिंकल्यानंतर शिव हिंदी बिगबॉसमध्ये काही स्वप्नं डोळ्यासमोर ठेऊन आला होता. त्यातले एक स्वप्न सलमान खानसोबत उभे राहायचे त्याने पूर्ण केले. आता पुढील सर्व स्वप्न त्याला पूर्ण करायची आहेत. शो संपल्यानंतर शिवने एका मुलखतीमध्ये सलमान खानबद्दल भरभरून भावना व्यक्त केल्या आहेत. बिग बॉसच्या फिनालेनंतर पार पडलेल्या पार्टीमध्ये सलमान शिवला भेटला. यावर शिव म्हणाला, “सलमान खानला भेटणे माझ्यासाठी गर्वाची बाब आहे. सर माझ्या आईवडिलांना देखील भेटले आणि त्यांच्याशी मराठीमध्ये संवाद साधला. याचा मला खूप अभिमान आहे.”
पुढे शिव म्हणाला, “सलमान खान सरांनी मला त्यांच्याजवळ बसवले आणि माझ्या करियर संदर्भात मला मार्गदर्शन केले. सोबतच त्यांनी मला काही मराठी प्रोजेक्ट्सबद्दल देखील माहिती दिली. मला माझ्या भविष्यासाठी काही गोष्टी सांगितल्या. मी हवेत असताना सलमान खान माझ्याजवळ आले आणि बसून माझ्याशी बोलले ही गोष्ट माझ्यासाठी खूपच मोठी आहे.” आता यावरून सलमान खान शिवला त्याच्या आगामी प्रोजेक्ट्समध्ये संधी देणार की नाही हे तर वेळच सांगेल मात्र सलमानने त्याला मराठी प्रोजेक्ट्सबद्दल देखील माहिती दिली असल्यामुळे आता शिव मराठीमध्ये दिसणार हे तर नक्की झाले आहे.
तत्पूर्वी शिव ठाकरेने ‘रोडीज’मध्ये सहभाग घेतला होता. त्यानंतर तो मराठी बिग बॉसच्या दुसऱ्या पर्वत दिसला आणि हे पर्व त्याने जिंकले देखील. लवकरच शिव खतरो के खिलाडीच्या १३ व्या पर्वात दिसणार असून, हा शो त्याने जिंकावा अशीच सर्वांची इच्छा आतापासूनच आहे.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
आता सुट्टी नाही! 21 दिवसांनंतरही बॉक्स ऑफिसवर ‘पठाण’चाच डंका, कमाईचा आकडा उडवेल तुमचीही झोप
स्मिता पाटील यांचा मुलगा प्रसिद्ध अभिनेत्रीच्या प्रेमात, टॅटू दाखवत केला नात्याचा खुलासा; पाहा फोटो