हिंदी चित्रपट जगताचा दबंग अशी अभिनेता सलमान खानची(Salman Khan) ओळख आहे. चित्रपट जगतात जर आपले स्थान भक्कम करायचे असेल, तर भाईजानचा हात डोक्यावर पाहिजेच अशी अनेकांची भावना असते. त्यामुळे सलमान खानच्या प्रत्येक पोस्टची आणि चित्रपटाची चर्चा होताना दिसत असते. गेली अनेक वर्षे सलमान खान आणि युलिया वंतूरच्या(Lulia Vantur) प्रेम प्रकरणाची दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे. आता ही चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे. कारण अभिनेता सलमान खानने थेट युलिया वंतूरच्या गाण्याचे प्रमोशन करणारी पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे.
याबाबत संपूर्ण माहिती अशी की, सलमान खानने त्याची कथित गर्लफ्रेंड युलिया वंतूरचे गाणे ‘डिजाइनर लहंगा’चे सोशल मीडियावर प्रमोशन केले आहे. सलमान खानने त्याच्या इंस्टाग्रामवर हे गाणे प्रमोट केले आहे. हे दमदार गाणे प्रसिद्ध गायक हिमेश रेशमियाने बनवलेले आहे, तर गाण्याला यूलिया वंतूरने आवाज दिला आहे. या दोघांचे हे दुसरे गाणे आहे. याआधी दोघांनी ‘एवरी नाइट एंड डे’ तयार केले होते.
Presenting a new track ‘Designer Lehenga’ composed by super rockstar #HimeshReshammiya and written by #ShabbirAhmed and sung by @IuliaVantur from the blockbuster hit album Moods with melodies. Song out now so give it all your love https://t.co/zRzQPgFzs7
— Salman Khan (@BeingSalmanKhan) March 24, 2022
सलमान खानने फक्त या गाण्याला प्रमोटच नाही केले, तर त्यांच्या समर्थकांना हे गाणे पाहण्याचे आवाहनही आहे. याबद्दल सलमान खान लिहतो की, “सुपर रॉकस्टार हिमेश रेशमिया यांनी तयार केलेले शब्बीर अहमद यांनी लिहिलेले आणि उलिया वंतूरने गायलेले गाना डिझाइनर लहंगा तुमच्यासाठी भेटीला येत आहे. जोरदार प्रतिसाद द्या असे म्हटले आहे.” त्याच्यासोबत त्याने गाण्याची लिंकही शेअर केली आहे.
दरम्यान या गाण्यांबद्दल सांगताना उलिया वंतूर म्हणते की, “मी बराच काळ हिमेशसोबत गाणी गात आहे. काही दिवसांपूर्वी आम्ही आमचे पहिले गाणे रेकॉर्ड केले होते. आता मी हिमेशसोबत दुसरे गाणे गात आहे. याबद्दल मी त्याची आभारी आहे. तो नेहमीच मला प्रोत्साहित करत असतो आणि संधी देत असतो.” दरम्यान सध्या सलमान खानच्या या पोस्टची सगळीकडे चर्चा रंगली आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा