×

बिग बॉसच्या मंचावर पहिल्यांदाच आली युलिया वंतूर, सलमान खानसोबत केला रोमँटिक डान्स

‘बिग बॉस १५’ आता शेवटच्या टप्प्याकडे वाटचाल करत आहे. अशा परिस्थितीत शोबद्दल प्रेक्षकांची क्रेझ दिवसेंदिवस वाढत आहे. अलीकडेच वीकेंड का वारमध्ये अनेक कलाकार सलमान खानसोबत स्टेज शेअर करताना दिसले. पण या आठवड्यात सलमानसोबत बिग बॉसच्या मंचावर दिसणारी सर्वात खास सदस्य म्हणजे त्याची खास मैत्रीण युलिया वंतूर. युलिया वंतूर आणि सलमान पहिल्यांदाच सिंगलसाठी एकत्र आले आहेत. ज्यांच्या प्रमोशनसाठी युलिया बिग बॉसच्या मंचावर आली होती. ही पहिलीच वेळ होती जेव्हा युलिया सलमानसोबत बिग बॉसचा स्टेज शेअर करताना दिसली.

सलमान खानने युलियाचे केले स्वागत

बिग बॉसच्या मंचावर युलियाने (Iulia Vantur) तिचे नवीन गाणे ‘मैं चला’ गायले. हे गाणे ऐकल्यानंतर सलमान (Salman Khan) युलियाचे कौतुक करण्यापासून स्वतःला रोखू शकला नाही. सलमानच्या तोंडून स्तुती ऐकून युलियाने हिंदीत थँक्स म्हणताच सलमानच्या चेहऱ्यावर खूप हसू आले आणि तो युलियाचे नाव घेऊन तिची छेड काढताना दिसला. होस्ट सलमान खानने पहिल्यांदाच बिग बॉसच्या मंचावर युलियाचे स्वागत केले. यावर उत्तर देताना युलिया म्हणाली की, “मला हा शो (बिग बॉस) खूप आवडतो आणि मी आज हिंदीत बोलण्याचा प्रयत्न करेन.”

View this post on Instagram

A post shared by ColorsTV (@colorstv)

युलियाची हिंदी ऐकून सलमानची पटली खात्री

आपल्या नवीन गाण्याच्या प्रमोशनसाठी आलेल्या सलमानने युलियाला गाण्याबद्दल विचारले असता, युलियाने उत्तर दिले की, “हे गाणे माझ्या हृदयाच्या खूप जवळ आहे. कारण हे गाणे खूप प्रेमाने बनवले गेले आहे आणि हे गाणे आम्हाला आवडते.” युलियाने या गाण्याचे कौतुक करत या व्हिडिओमध्ये सलमान खान असल्याचे सांगितले. सलमानही युलियाच्या हिंदीचे कौतुक करण्यास मागे हटला नाही. सलमानने युलियाच्या हिंदीचे कौतुक करत ‘क्या हिंदी बोल रही है मॅडम आज कल, लवली’ असे म्हटले आहे.

सलमान आणि युलियाने केला रोमँटिक डान्स

युलिया वंतूर व्यतिरिक्त, ‘मैं चला’ गाण्यात दिसणारी दक्षिण अभिनेत्री प्रज्ञा जैस्वाल देखील मंचावर आली आणि तिचा अनुभव शेअर केला. यानंतर सलमान खानने त्याच्या रोमँटिक गाण्यावर आधी प्रज्ञा जैस्वाल आणि नंतर युलिया वंतूरसोबत डान्स केला. युलिया वंतूर सलमान खान आणि त्याच्या कुटुंबाच्या खूप जवळ आहे. तिला अनेकदा सलमान खानसोबत फॅमिली फंक्शन्समध्ये स्पॉट केले गेले आहे.

हेही वाचा :

‘गहराइया’ चित्रपटातील ‘डूबे’ गाणे रिलीझ, गाण्यात दिसली दीपिका पदुकोण आणि सिद्धांत चतुर्वेदीची बोल्ड केमिस्ट्री

‘सोनाक्षी सिन्हा लग्न कधी करणार?’ चाहत्याच्या प्रश्नाला ‘दबंग’ गर्लने दिले ‘हे’ उत्तर

‘दृश्यम’ चित्रपटात अनुची भूमिका साकारून प्रेक्षकांची मने जिंकणारी ‘ही’ बालकलाकार झालीये मोठी, पाहून व्हाल थक्क

 

Latest Post