Tuesday, April 16, 2024

फराह खानने शेअर केलेल्या ‘त्या’ थ्रो बॅक फोटोवर, बॉलिवूड कलाकार झाले फिदा

हिंदी चित्रपट जगतातील अभिनेते आणि अभिनेत्रींचे अनेक जुने फोटो सोशल मीडियावर आपल्याला पाहायला मिळतात. या फोटोंची चाहत्यांमध्ये नेहमीच चर्चा रंगलेली दिसते. अनेक कलाकारांचे चाहते हे फोटो शेअर करत असतात. मात्र यावेळी कोणत्या चाहत्याने नव्हेतर खुद्द कोरिओग्राफर फराह खानने(Farah Khan) एक भन्नाट जुना फोटो शेअर केला आहे, ज्यावर चित्रपट जगतातील अनेक दिग्गज कलाकारांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.नक्की कोणता आहे तो फोटो चला जाणून घेऊ.

चित्रपट निर्माती आणि कोरिओग्राफर फराह खानने जुन्या काळातील असा एक भन्नाट फोटो शेअर केला आहे, जो सिनेप्रेमींसाठी चांगलाच अनमोल ठरला आहे. या फोटोमध्ये सलमान खान (Salman Khan), शाहरुख खान (Shahrukh Khan), करण जोहर(Karan Johar), अनिल कपूर(Anil Kapoor) आणि फराह स्वतः दिसत आहेत. हे सगळे कलाकार जोरदार नाचत असून, हा फोटो संजय कपूर आणि महीप कपूर यांच्या संगीत सोहळ्याचा आहे. जो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा फोटो शेअर करत फराह खानने ‘तेही दिवस होते’ असे मजेशीर कॅप्शन दिले आहे. ‘अनिल कपूर पाजीला धक्का बसला आहे. कृपया अतिशय प्रसिद्ध बॅकग्राउंड डान्सर्स शोधा’ असेही या कॅप्शनमध्ये फराहने लिहले आहे. सध्या या फोटोवर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.

या फोटोवर बॉलिवूडमध्ये अनेक कमेंट्स येत आहेत. संजय कपूरने प्रतिक्रिया देताना, ‘वधू आणि वर कुठे आहेत?’ असा प्रश्न केला आहे. त्याचवेळी महीपने ‘लव्ह इट’ असे लिहिले आहे. याशिवाय करण जोहरनेही कमेंटमध्ये ‘वाह.’ लिहले आहे. त्याच वेळी, झोया अख्तरसह इतर सेलिब्रिटींनी देखील या पोस्टवर जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत.

संजय कपूर आणि महीप कपूर यांनी डिसेंबर 1998 रोजी लग्नाच्या बेडीत अडकण्याचा निर्णय घेतला होता म्हणजेच हा फोटो 24 वर्षे जुना आहे. दोघेही शनाया कपूर आणि जेहानचे आई-वडील आहेत. शनाया लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे, पण ती त्याआधीच खूप लोकप्रिय झाली आहे. तिचा इंस्टाग्रामवर मोठा चाहता वर्ग आहे. शनाया करण जोहरच्या ‘बेधडक’मधून पदार्पण करणार आहे. त्याचप्रमाणे अनिल कपूर यांची मुलगी सोनम कपूर सध्या खूप चर्चेत आहे. सोनमने नुकतीच प्रेग्नेंसीची घोषणा केली आहे. शाहरुख खान २०१८ नंतर पडद्यावर परतण्यासाठी सज्ज झाला आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हे देखील वाचा