[rank_math_breadcrumb]

‘राधे…’ चित्रपटातील टायटल ट्रॅकचा मेकिंग व्हिडिओ व्हायरल, असे काय झाले की, दिशा पटानीला सलमान खानला म्हणावे लागले सॉरी

बॉलिवूड अभिनेता सलमान खान आणि दिशा पटानी यांचा बहुचर्चित चित्रपट ‘राधे: योर मोस्ट वाँटेड भाई’ या चित्रपटाच्या ट्रेलरसोबत गाणी देखील खूप चर्चित आहेत. याआधी या चित्रपटातील दोन गाणी प्रदर्शित झाली आहेत. या गाण्यांना प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. या चित्रपटाचे टायटल ट्रॅक वाँटेड हे गाणे प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटातील टायटल ट्रॅकची चाहते खूप आतुरतेने वाट बघत होते. एकीकडे या गाण्यातील सलमान खानचा स्वॅग सर्वांना आवडत आहे, तर दुसरीकडे दिशा पटानीच्या डान्सने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

वाँटेड या टायटल ट्रॅकचा मेकिंग व्हिडिओ प्रदर्शित होताच सर्वत्र धुमाकूळ घालत आहे. या व्हिडिओमध्ये सलमान खान आणि चित्रपटातील अनेक व्यक्ती बोलताना दिसत आहेत. या व्हिडिओच्या सुरुवातीला सलमान खान सांगतो की, साजिद-वाजिद सोबत या गाण्याची सुरुवात झाली आहे. तसेच सलमान खान आणि दिशा पटानी हे दोघे डान्स करत आहेत. डान्स करता करता अचानक सलमान खान थांबतो आणि म्हणतो की, डान्स करण्यासाठी मला थोडी जागा तरी द्या. यांनतर दिशा स्माईल करून खूप प्रेमाने त्याला सॉरी म्हणते. यावर तिथे असलेले सगळेजण हसायला लागतात.

रिलीज केलेला हा मेकिंग व्हिडिओ खूपच मजेदार आहे. या व्हिडिओत सलमान खान सोबतच राधे चित्रपटाचे दिग्दर्शक प्रभूदेवा आणि कोरिओग्राफर आपापसात बोलताना दिसत आहेत. या मेकिंग व्हिडिओमध्ये प्रत्येकजण मस्ती करताना दिसत आहे. राधेच्या टायटल ट्रॅकला साजिद-वाजिदने म्युझिक दिले आहे. साजिदने या गाण्याचे लिरिक्स लिहिले आहे. मुद्दसर खानने या गाण्याची कोरिओग्राफी केली आहे.

हा चित्रपट ईदच्या दिवशी म्हणजेच 13 मेला प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट झी5 वर ‘पे पर व्ह्यू’ ने बघता येणार आहे. सोबतच डीटीएच प्लॅटफॉर्म सारख्या डिश, डी2 एच, टाटा स्काय आणि एअरटेल टीव्हीवर देखील बघता येणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-सुपरस्टार दिलीप कुमार आणि राज कपूर यांच्या हवेली ताब्यात घेण्याचा पाकिस्तान सरकारचा निर्णय; मालकांना बजावली नोटीस

-डॉक्टरांना ‘सैतान’ म्हणणे सुनील पालला पडले भलतेच महागात! कॉमेडियन विरोधात एफआयआर दाखल

-‘अंदाज अपना अपना’ चित्रपटादरम्यान ‘या’ कारणामुळे आमिर खानला आवडत नव्हता सलमान खान; नंतर बनले जिगरी मित्र

author avatar
Tejswini Patil