बॉलिवूडमधून एक हैराण करणारी बातमी समोर येत आहे, जे ऐकून तुम्हीही स्तब्ध व्हाल. अभिनेता सलमान खानला (Salman Khan) जीवे मारण्याची धमकी देणारे पत्र मिळाले आहे. जेव्हा सलमान खानचे वडील सलीम खान (Saleem Khan) सकाळी जॉगिंगसाठी गेले, तेव्हा ते बेंचवर बसले होते. त्याचवेळी त्यांना एक पत्र सापडले, ज्यामध्ये त्यांना आणि त्यांचा मुलगा सलमान खानला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली.
या पत्रात, सलमान खानचाही सिद्धू मूसेवाला (Sidhu Moosewala) करणार असल्याचे लिहिले होते. पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे. सकाळी साडे सात ते आठच्या सुमारास सलीम खान यांना हे पत्र मिळाले. वांद्रे पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. (salman khan received death threats father salim khan found a letter while walking)
अलीकडेच पंजाबी गायक सिद्धू मूसेवाला यांची भरदिवसा गोळ्या घालून हत्या करण्यात आली. अनेकांनी एकाचवेळी त्याच्यावर हल्ला केला आणि सुमारे २५-३० गोळ्या झाडल्या. या हल्ल्यात गायकाला आपला जीव गमवावा लागला. सिद्धू मुसेवालाच्या निधनानंतर संपूर्ण इंडस्ट्रीत शोककळा पसरली आहे. दरम्यान, सलमान खानला धमकीचे पत्र आल्यानंतर त्याचे चाहते चिंतेत पडले आहेत.
सलमान खानच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर त्याने नुकत्याच झालेल्या आयफा २०२२ला होस्ट केले. सलमान हा अवॉर्ड फंक्शन होस्ट करत असल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. आयफा २०२२ अबू धाबी येथे पार पडला. दरम्यान सलमान आता मुंबईत परतला आहे.
अभिनेता लवकरच ‘टायगर ३’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत कॅटरिना कैफ (Katrina Kaif) मुख्य भूमिकेत दिसणार आहे. शिवाय तो लवकरच त्याच्या आगामी ‘कभी ईद कभी दिवाली’ या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत पूजा हेगडे (Pooja Hegde), शहनाज गिल (Shehnaz Gill) महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा