×

काश्मीरच्या सौंदर्यात एकांत अनुभवताना दिसली दाक्षिणात्य अभिनेत्री समंथा, मनमोहक फोटो केला शेअर

दाक्षिणात्य सिने जगताची सौंदर्यतारका समंथा रुथ प्रभू (Samantha Ruth Prabhu) आपल्या दमदार अभिनयासाठी आणि घायाळ करणऱ्या सौंदर्यासाठी सर्वत्र लोकप्रिय आहे. अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये समंथाने आपल्या अभिनयाची वेगळी छाप पाडली आहे. तिच्या अभिनयाइतकीच सोशल मीडिया पोस्टचीही नेहमीच चर्चा होताना दिसत असते. आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरुन ती नेहमीच नवनवीन फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. समंथा सध्या काश्मीरमध्ये विजय देवरकोंडासोबत तिच्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगमध्ये आहे. अलीकडेच तिने चित्रपटाच्या सेटवरच विजयचा वाढदिवस साजरा केला. आता पुन्हा एकदा समंथाने तिचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत, जे इंटरनेटवर व्हायरल होत आहेत.

सामंथाने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर काश्मीरच्या शांत वातावरणाचा फोटो शेअर केला आहे. काश्मीरच्या सुंदर दृश्याचा आनंद घेताना तिने आनंदी क्षणांची झलक दाखवली आहे. या व्हायरल फोटोंमध्ये ती काश्मीरच्या नैसर्गिक सौंदर्यात छत्रीखाली खुर्चीवर बसलेली दिसत आहे. स्वतःचा हा फोटो शेअर करत, “एकांत” असा सुचक कॅप्शन लिहला आहे. सामंथा 15 दिवसांपासून विजय देवरकोंडासोबत शिव निर्वाणच्या चित्रपटाचे शूटिंग करत आहे.

View this post on Instagram

A post shared by Samantha (@samantharuthprabhuoffl)

या शूटिंगमुळे विजयने काश्मीरमध्ये चित्रपटाच्या सेटवर वाढदिवस साजरा केला. विजय आणि सामंथा यांनी वाढदिवसाचा हा व्हिडिओ आणि फोटो शेअर केला होता, जो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या चित्रपटाचे काश्मीरमधील शूटिंगचे पहिले शेड्यूल लवकरच पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. शिव निर्वाण दिग्दर्शित या चित्रपटाचे नाव सध्या ‘VD11’ असे आहे. काश्मीरच्या पार्श्वभूमीवर हा चित्रपट तयार करण्यात आला आहे. मायथ्री मूव्ही मेकर्सच्या बॅनरखाली नवीन येरनेनी आणि रविशंकर यलमांचिली हे समंथा आणि विजय यांच्या चित्रपटाची निर्मिती करत आहेत. या चित्रपटाशी संबंधित अधिक माहिती लवकरच समोर येण्याची शक्यता आहे.

या चित्रपटासोबतच समंथा गुणशेखरचा पौराणिक चित्रपट ‘शकुंतलम’, ‘यशोदा’, बॉलिवूड चित्रपट ‘सिटाडेल’ आणि हॉलिवूड चित्रपट ‘अरेंजमेंट ऑफ लव्ह’ अशा अनेक चित्रपटांमध्ये झळकरणार आहे. हरिशंकर आणि हरीश नारायण दिग्दर्शित पॅन इंडिया हॉरर थ्रिलर ‘यशोदा’च्या शूटिंगमध्येही ती व्यस्त आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला, त्यामुळे प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाची उत्सुकता वाढली आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

Latest Post