घरात झाला मोठा धमाका! एकाच झटक्यात ‘बिग बॉस’ने ‘या’ दोन स्पर्धकांना दाखवला थेट बाहेरचा रस्ता

‘बिग बॉस १५’मध्ये, या वीकेंडच्या वारमध्ये कोणताही स्पर्धक बेघर झाला नव्हता. घरातील सदस्य आणि घराबाहेरील त्यांचे चाहतेही याबद्दल खूप आनंदी होते. पण बिग बॉस हा संपूर्ण अनिश्चिततेचा खेळ आहे. निर्माते या शोमध्ये कधीही ट्विस्ट आणतात आणि पुन्हा एकदा असेच काहीसे घडले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ‘बिग बॉस’च्या घरात डबल इव्हिक्शन बॉम्बचा स्फोट झाला आहे. ‘बिग बॉस’ वेळोवेळी कुटुंबातील सदस्यांना धक्का देत राहतो आणि पुन्हा एकदा त्याने तेच केलं आहे.

खरं तर, घरातील सदस्य ‘बिग बॉस’च्या घराचे काही नियम मोडतात, त्यानंतर ‘बिग बॉस’ घरातल्या प्रत्येकाला शिक्षा करतो. पहिली शिक्षा म्हणजे प्रत्येक स्पर्धकाला जंगलावासी बनवले जाते. दुसरी शिक्षा अशी की, कोणत्याही दोन स्पर्धकांना परस्पर संमतीने बाहेर काढणे आणि तिसरी शिक्षा म्हणून नवीन कॅप्टन निशांत भट्टला ८ नावे द्यावी लागतील, ज्यांना थेट नॉमिनेट केलं जाईल. हे ऐकून सर्व स्पर्धकांना धक्का बसला आहे. (salman khan show bigg boss 15 vidhi pandya and donal bisht are evicted from show)

View this post on Instagram

A post shared by ColorsTV (@colorstv)

बिग बॉस घरातील सर्व सदस्यांना त्यांचे मत विचारतो आणि त्यांना दोन सदस्यांची नावे विचारतो. अशाप्रकारे, घरातील सदस्य डोनल बिष्ट आणि विधी पंड्या यांचे नाव घेतात. मिळालेल्या माहितीनुसार, विधी पंड्या आणि डोनल बिष्ट यांना सदस्यांच्या मतदानानंतर शोमधून बाहेर काढण्यात आले आहे.

View this post on Instagram

A post shared by ColorsTV (@colorstv)

डोनल बिष्ट आणि विधी पंड्या या घरातील मजबूत खेळाडूपैकी एक होत्या. त्याचे बाहेरही चांगले फॅन फॉलोइंग होते. अशा स्थितीत डोनल बिश्ट आणि विधी पांड्याच्या चाहत्यांसाठी ही निराश करणारी बातमी आहे. त्यांना विश्वासच बसत नाहीये की, शोच्या सुरुवातीच्या टप्प्यातच बिग बॉसने घरात असा धमाका केला आहे.

त्याचबरोबर कॅप्टन निशांत भट्टने नॉमिनेट केलेल्या ८ जणांमध्ये ईशान सेहगल, मायशा अय्यर, सिम्बा नागपाल, अफसाना खान, उमर रियाज, करण कुंद्रा, शमिता शेट्टी आणि विशाल कोटीयन यांचा समावेश आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-बिग बॉसच्या घरात फुलतेय मैत्री! ‘मला तू खूप आवडतेस’, म्हणत ‘या’ मुलीबद्दल व्यक्त झाला करण कुंद्रा

-शमितासाठी सरप्राईज का करणसाठी असेल झटका, राकेश का अनुषा? कोणाची होणार वाईल्ड कार्ड एन्ट्री?

-‘बिग बॉस १५’मध्ये अफसाना खानचं ‘जंगली रूप’; अकासा सिंगचा फाडला शर्ट, तर शमिता शेट्टीला म्हणाली ‘म्हातारी’

Latest Post