Friday, April 19, 2024

शमितासाठी सरप्राईज का करणसाठी असेल झटका, राकेश का अनुषा? कोणाची होणार वाईल्ड कार्ड एन्ट्री?

लोकप्रिय टीव्ही रियॅलिटी शो ‘बिग बॉस १५’ सुरू होऊन फक्त २ आठवडे झाले आहेत आणि कुटुंबातील सदस्यांमध्ये दंगल सुरू झालेली पाहायला मिळत आहे. स्पर्धकांमधील मारामारीपासून ते रोमान्सपर्यंत सर्व काही चर्चेत आहेत. केवळ स्पर्धकच नाही, तर निर्माते देखील सीझन हिट करण्यासाठी कोणतीही कसर सोडत नाहीत. आता, सीझनमध्ये अधिक मसाला घालण्यासाठी, निर्मात्यांनी घरात वाइल्ड कार्ड एन्ट्री आणण्यास सुरुवात केली आहे, ज्यामुळे घरातील सदस्यांमधील समीकरणं बदलू शकतात.

या वाइल्ड कार्ड एन्ट्रीमध्ये ज्या नावांची सर्वाधिक चर्चा होत आहे, तो आहे राकेश बापट आणि अनुषा दांडेकर. राकेश बिग बॉस ओटीटी स्पर्धक आणि शमिता शेट्टीचा मित्र आहे, तर अनुषा दांडेकर करण कुंद्राची एक्स गर्लफ्रेंड आहे. करण आणि अनुषा सहा वर्षांच्या नात्यानंतर विभक्त झाले होते. रिपोर्ट्सनुसार, या शोचा भाग होण्यासाठी अनुषाला मोठ्या रकमेची ऑफर देण्यात आली आहे. (bigg boss 15 raqesh bapat or anusha dandekar who will enter as wild card contestant )

ब्रेकअपनंतर अनुषाने करण कुंद्रावर फसवणुकीचा आरोप केला होता. अलीकडेच करण कुंद्राने शोमध्ये स्पष्टीकरण दिले होते की, अनुषा जर या शोचा भाग बनली तर त्याला त्यात कोणतीही अडचण नाही. म्हणजेच, करण कुंद्रा आधीच प्रत्येक परिस्थितीसाठी तयार झाला आहे.

दुसरीकडे, राकेश बापटने अलीकडेच पत्नी रिद्धी डोगरापासून घटस्फोट घेतला आहे. त्यानंतर ‘बिग बॉस ओटीटी’मध्ये शमिता शेट्टीसोबत त्याची जवळीक वाढली आणि शो सोडल्यानंतरही दोघे अनेक वेळा एकत्र दिसले. या शोमध्ये दोघांचा रोमान्स तर चर्चेत होताच, पण त्यांच्यातील भांडणांनीही बऱ्याच चर्चा रंगवल्या होत्या.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘बिग बॉस १५’ सापडला वादाच्या विळख्यात, सेट डिझाईनरवर लावले जातायेत चोरीचे आरोप

-‘अशक्य सुंदर’, अमृता खानविलकरचा फोटो पाहून चाहते तर सोडाच, कलाकारांनीही पाडला कमेंट्सचा पाऊस

-‘कुछ कुछ होता है अभ्या…’, म्हणत ‘सुंदरा मनामध्ये भरली’ फेम अक्षयाने मजेशीर फोटो केले शेअर

हे देखील वाचा