Monday, June 24, 2024

नेपोटिझमबाबत आयुष शर्माने मांडले मत; सलमान, शाहरुखचा उल्लेख करत म्हणाला, ‘प्रत्येक अभिनेता स्वार्थी…’

‘लव्ह यात्री’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारा अभिनेता म्हणजे आयुष शर्मा होय. या चित्रपटातून त्याने चांगली लोकप्रियता मिळाली. आयुषची अभिनेत्याव्यतिरिक्त आणखी एक ओळख आहे. ती म्हणजे, तो सलमान खानचा मेहुणा आहे. नुकताच सलमान आणि आयुषचा नवीन ‘अंतिम: द फायनल ट्रूथ’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. यामुळे आता आयुष भलताच चर्चेत आहे. विशेष म्हणजे, आयुषने यादरम्यान नेपोटिझमवर चर्चा केली आहे.

‘प्रत्येक अभिनेता स्वार्थी’
“आजच्या काळात प्रत्येक अभिनेता स्वार्थी झाला आहे. आज जर तुम्ही मला विचाराल तर कोणी ही ऑफर (अंतिम) नाकारेल का? कोणीही नाकारणार नाही, प्रत्येकाला ही ऑफर स्वीकारायला आवडेल. मी आज सलमान भाईसोबत पोस्टरमध्ये आहे, पण जर तुम्ही मला सांगितले की तुम्हाला शाहरुख खानसोबत पोस्टरमध्ये यायला आवडेल? तर मी म्हणेन, १०० टक्के. आपल्या सर्वांना माहित आहे की, ते खूप मोठे स्टार आहेत आणि जर तुम्ही त्यांच्यासोबत काम केले, तर तुम्हाला प्रेक्षक नक्कीच मिळतील,” असे माध्यमांशी बोलताना आयुष म्हणाला.

वरुण धवनचेही घेतले नाव
यानंतर आयुषने वरुण धवनबाबतही सांगितले. त्याने वरुणच्या एका गोष्टीचा संदर्भ देत म्हटले की, “एकदा वरुणने मला त्याच्या विचारांबद्दल सांगितले. तो म्हणाला, ‘मी एक चित्रपट केला होता दिलवाले आणि त्याची शूटिंग परदेशात करायची होती, त्यावेळी तिथले लोक श्रद्धा कपूरला ओळखत होते पण मला नाही. पण जेव्हा दिलवाले रिलीज झाला . त्या चित्रपटाच्या प्रसिद्धीनंतर लोकांनी माझे जुने चित्रपट पाहायला सुरुवात केली. चित्रपटांच्या यशाबरोबरच लोक त्यांना ओळखू लागले.”

मोठे आहे सलमानचे हृदय
चर्चेदरम्यान शेवटी आयुष म्हणाला की, “त्यामुळे मला काही फरक पडत नाही. अर्थात, कुटुंबातील सदस्य म्हणून तुम्ही कुटुंबातील सदस्याप्रमाणे विचार कराल, पण एक अभिनेता म्हणून तुम्ही ती संधी कोणत्याही प्रकारे जाऊ देणार नाही. मी फक्त एकाच गोष्टीचा विचार करत होतो की, मला माझ्या पात्राला न्याय द्यायचा आहे. सलमान खानचे हृदय खूप मोठे आहे, तो म्हणतो, ‘असे अनेक लोक आहेत जे तुम्हाला स्वप्न दाखवतील, पण जेव्हा तुम्ही पडाल, तेव्हा ते तुमची पाठ दाखवतील.’ पण सलमान भाऊ नेहमी हजर असतो, आणि तो म्हणतो, ‘बघा स्वप्न अजून पूर्ण झाले नाही.’ सलमानने अनेकांना संधी दिली, पण लोक फक्त कुटुंबाबद्दल बोलतात, ज्यांचा सिनेमाशी संबंध नाही त्यांच्याबद्दल कोणी बोलत नाही, पण भाईने त्यांना संधी दिली.”

‘अंतिम’ सिनेमात सलमान खान एका पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत झळकणार आहे, तर आयुष शर्मा एका गुंडाच्या भूमिकेत दिसणार आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन महेश मांजरेकर यांनी केले असून निर्मिती सलमान खाननेच केली आहे. या सिनेमात सलमान खानचा पुन्हा एकदा दबंग अंदाज पाहायला मिळणार आहे. राजवीर सिंग असे त्याच्या भूमिकेचे नाव आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘फिट ऍंड फाईन’ दिसणारे अनिल कपूर ‘या’ आजाराने आहेत त्रस्त, व्हिडिओ शेअर करत स्वत: केला खुलासा

-लाल बिकिनी घालून बीचवर ‘Chill’ करताना दिसली दिशा पटानी, बोल्ड फोटोला मिळतेय चाहत्यांची पसंती

-जेव्हा सुंदर ड्रेस अचानक खिसकला खाली, भर इव्हेंटमध्ये ‘Oops Moment’ची शिकार झाली मलायका अरोरा

हे देखील वाचा