मुंबईतील वांद्रे येथील सलमान खानच्या (Salman Khan) घराबाहेर झालेल्या गोळीबारानंतर अभिनेता आता कायमस्वरूपी पनवेलच्या फार्महाऊसवर जाण्याचा गंभीरपणे विचार करत असल्याचा दावा केला जात आहे. रविवारी, १४ एप्रिल रोजी अभिनेत्याच्या घर ‘गॅलेक्सी अपार्टमेंट’बाहेर पाच राऊंड गोळीबार झाला होता. या घटनेने केवळ सलमान खानच नाही तर संपूर्ण बॉलिवूड इंडस्ट्री हादरली आहे.
सलमान खानच्या एका जवळच्या मित्राने सांगितले की, अभिनेता कायमचा पनवेलमधील फार्म हाऊसमध्ये शिफ्ट होऊ शकतो. अभिनेत्याच्या मित्राने एका मीडिया पोर्टलला सांगितले की, ‘भाऊ त्याचा जास्तीत जास्त वेळ फार्म हाऊसवर घालवतो. सलमानला तिथे राहणे आवडते. ते लोकेशनही त्याच्या ‘बिग बॉस’ लोकेशनच्या जवळ आहे. शहरात त्यांची सुरक्षा धोक्यात आली आहे. त्यामुळे अभिनेता त्याच्या फार्महाऊसवर जाण्याचा गंभीरपणे विचार करत आहे. मात्र, यावर सलमानकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.
या घटनेनंतर सलमान खानच्या घराची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. या अभिनेत्याला महाराष्ट्र पोलिसांनी यापूर्वीच ‘वाय प्लस’ श्रेणीची सुरक्षा दिली आहे. गोळीबाराच्या घटनेनंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वत: सलमान खानच्या घरी भेटण्यासाठी पोहोचले आणि आरोपींवर कठोर कारवाईचे आश्वासनही दिले.
गोळीबारानंतरही सलमान खान पूर्णपणे बेफिकीर दिसत आहे. अलीकडेच तो दुबईलाही गेला होता, तिथून एका मोठ्या कार्यक्रमानंतर अभिनेता भारतात परतला. हा हल्ला केवळ प्रसिद्धीसाठी करण्यात आल्याचे सलमानचे वडील पटकथा लेखक सलीम खान यांनी सांगितले.
सलमान खानच्या वर्कफ्रंटबद्दल बोलताना, अलीकडेच त्याने त्याच्या आगामी चित्रपटाची घोषणा केली आहे. तो ‘एआर मुरुगादास’ सिकंदर या चित्रपटात दिसणार आहे. पुढील वर्षी ईदला हा चित्रपट प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा-
…म्हणून भाऊ कदमने नाकारला हिंदी शो; म्हणाला, ‘इथे जेवढा मान मिळतो तेवढा तिकडे…’
व्हायरल फेक व्हिडिओ प्रकरणी रणवीर सिंगने केली कारवाई, पोलिसांत तक्रार दाखल