Sunday, December 22, 2024
[aioseo_breadcrumbs]

विकी- कॅटरिनाच्या लग्नाच्या बातम्यांमुळे ट्रोल झाला सलमान, सोशल मीडियावर एकापेक्षा एक भन्नाट मिम्स व्हायरल

बॉलिवूड अभिनेता विकी कौशल (Vicky Kaushal) आणि अभिनेत्री कॅटरिना कैफ (Katrina Kaif) यांच्या लग्नाच्या बातम्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. रोज त्यांच्या लग्नाशी संबंधित काही ना काही अपडेट्स समोर येत असतात. अशा परिस्थितीत, आता नेटकऱ्यांनी सलमान खानची (Salman Khan) खिल्ली उडवायला सुरुवात केली आहे. सोशल मीडियावर त्याच्याशी संबंधित मिम्स मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

विकी आणि कॅटरिनाच्या लग्नाच्या बातम्या माध्यमांमध्ये जोर धरून आहे. या दरम्यान ट्रोलर्सने सलमान खानवर निशाणा साधलेला पाहायला मिळाला. त्याच्या नावाने अनेक मिम्स पोस्ट आणि शेअर केले जात आहे. जे पाहून तुम्हीही नक्कीच लोटपोट व्हाल. (salman khan trolled after vicky kaushal katrina kaif wedding news)

पाहा हे मिम्स…

लग्नाच्या तयारीने धरला जोर
माध्यमातील वृत्तानुसार, रणथंभोरची हॉटेल्स जास्त मोठी नसल्यामुळे, सेलिब्रिटी जोडप्याने एकूण ४५ हॉटेल पाहुण्यांसाठी बुकिंग करण्याची तयारी केली आहे. कारण लग्नाचे फंक्शन तीन दिवस चालणार असल्याने, अनेक दिवसांपासून हॉटेल्स बुक केल्याचे म्हटले जात आहे. महत्वाचे म्हणजे, स्थानिक हॉटेल्सनी इतर बुकिंग घेणे बंद केल्याचेही सांगितले जात आहे.

लवकरच येऊ शकतात लग्नाचे फोटो समोर
त्यामुळे लवकरच चाहत्यांना त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर पाहायला मिळणार आहेत का? आतापर्यंत याबाबतचा सस्पेन्स कायम आहे. चाहत्यांना अजून थोडी वाट पाहावी लागेल. विकी कौशल आणि कॅटरिना कैफ अनेक अवॉर्ड शोमध्ये एकमेकांसोबत फ्लर्ट करताना दिसले आहेत आणि अनेक मोठ्या कलाकारांनी याबाबत वक्तव्येही केली आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-कुणाल गांजावाला रसिकांसाठी घेऊन आला ‘भन्नाट पोरगी’, पाहायला मिळाली निक अन् सानिकाची रोमँटिक केमिस्ट्री

-जुही चावलासोबत सनी देओलचा रोमान्स; पाहून ढसाढसा रडला होता करण देओल, खुद्द अभिनेत्याचा खुलासा

-पती राजकुमार रावला निरोप देताना विमानतळावरच भावुक झाली पत्रलेखा, अभिनेत्यानेही दिली लक्षवेधी प्रतिक्रिया

हे देखील वाचा