बॉडीगार्ड शेराकडून सलमान खानसोबत पहिल्या भेटीच्या आठवणींना उजाळा, लवकरच करणार मुलाला लाँच

Salman Khan's bodyguard shera told a memories of their first meeting


बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान हा त्याच्या चित्रपटात जेवढ्या प्रेमाने, आपुलकीने वागताना दिसतो, तेवढीच नाती तो त्याच्या वैयक्तिक आयुष्यात देखील जपत असतो. त्याच्या आयुष्यात असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसोबत त्याचे एक अतूट बंधन आहे. यात समावेश होतो तो म्हणजे त्याचा बॉडीगार्ड शेराचा. तसं पाहायला गेलं, तर शेरा हा सलमान खानचा बॉडीगार्ड आहे, पण त्यांच्यात खूप मैत्रीपूर्ण प्रेम पाहायला मिळते. सलमान खान जिथे कुठे जातो, तिथे त्याच्या सोबत शेरा असतोच. नुकतेच शेराने त्याची आणि सलमान खानची पहिली भेट केव्हा आणि कधी झाली या गोष्टीचा खुलासा केला आहे.

व्हायरल बॉलिवूड सोबत बोलताना करताना शेराने सांगितले होते की, “मी पहिल्यांदा सलमान खानला तेव्हा भेटलो होतो, जेव्हा मी whigfield च्या शोमध्ये सेक्युरिटी होतो. तो एक हॉलिवूड गायक आहे. दुसऱ्या वेळेस मी सलमान खानला तेव्हा भेटलो, जेव्हा हॉलिवूड हिरो keanu reeves याला भारतात यायचे होते.”

त्यांनतर त्याने सांगितले की, “सलमान खान सोबत मी पहिला शो चंदीगढमध्ये केला. त्यांनतर आम्ही एकत्र आलो.” यासोबतच शेराने सांगितले की, सलमान खान लवकरच त्याच्या मुलाला लाँच करणार आहे. याबाबत शेराने सांगितले की, “हा कोरोना कालावधी संपल्यानंतर सलमान खान अधिकृतरीत्या या गोष्टीची घोषणा करणार आहे.” इतकेच नाही, तर सलमान खानने बॉडीगार्ड हा चित्रपट त्याचा बॉडीगार्ड शेराला समर्पित केला होता.

शेराने सांगितले की, “बॉलिवूडमध्ये असा कोणताच कलाकार नाहीये ज्याने त्याच्या बॉडीगार्डसाठी एवढं केलं आहे.” द इंडियन एक्स्प्रेस सोबत बोलताना शेराने सांगितले होते की, “मी त्या घोड्यासारखा आहे जो लग्नात नवरदेवाला घेऊन जाण्यासाठी तयार असतो. मी माझ्या मालकाबद्दल अत्यंत निर्धास्त आहे. कारण जिथे कुठे तो जातो तिथे मी असतोच. मी येस मॅन आहे.”

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘तू एक हिरो आहेस’, अभिनेत्री सारा अली खानने केलेल्या ‘या’ कामामुळे सोनू सूदेकडून प्रशंसा

-ढोल ट्विस्टसोबत व्हायरल झाले रवीना टंडनचे ‘टिप टिप बरसा पाणी’ गाणे, अभिनेत्रीनेही व्हिडिओ केला शेअर

-श्वास रोखून धरा! तब्बल १०० कोटी रुपये घेत साऊथ सुपरस्टार ‘विजय देवरकोंडा’ करणार बॉलिवूडमध्ये धमाकेदार एंट्री


Leave A Reply

Your email address will not be published.