वयाच्या सोळाव्या वर्षी बॉलिवूडमध्ये पाऊल टाकणारी आणि आणि सगळ्यांचा मनावर अधिराज्य गाजवणारी अभिनेत्री म्हणजे सोमी अली. या दिवसात ती खूपच चर्चेत आहे. सोमी खूप दिवसापासून चित्रपटसृष्टीपासून लांब आहे. पण सलमान खानची एक्स गर्लफ्रेंड असल्याकारणाने ती नेहमीच चर्चेत असते. बॉलिवूडपासून लांब जाण्याचे कारण सांगताना तिने अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे.
नुकतेच झूमला दिलेल्या एका मुलाखतीत सोमीने अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. तसेच बॉलिवूडमध्ये तिच्यासोबत घडलेल्या एका वाईट प्रसंगाचा देखील तिने खुलासा केला आहे. या कारणामुळे बॉलिवूडमध्ये तिला काम करण्यास अडचण निर्माण झाली, असे सांगत तिने अनेक प्रसंग शेअर केले आहेत.
सोमी अलीने तिचा अनुभव शेअर करताना सांगितले की, “बॉलिवूड मधील काही दिग्दर्शकांनी माझ्यासोबत लैंगिक संबंध ठेवण्याचा प्रयत्न केला.” तसेच या गोष्टीमुळे तिला मानसिकदृष्ट्या किती आणि कशाप्रकारे सामोरे जायला लागले हे तिने सांगितले. एकूणच बॉलिवूडमधील तिचा अनुभव खूप वाईट होता असेही तिने सांगितले.
जेव्हा तिला बॉलिवूडमध्ये पुनरागमन करण्याबाबत विचारले, तेव्हा तिने कोणताही विचार न करता नाही असे सांगितले. तिने सांगितले की, तिला बॉलिवूडमध्ये परत येण्यात आता काहीही रस उरलेला नाहीये. ती आता पूर्णपणे बॉलिवूडपासून लांब गेली आहे.
मुलाखतीत तिने तिच्या आणि सलमान खानच्या यांच्या झालेल्या ब्रेकअप बद्दल देखील सांगितले. याबाबत बोलताना तिने सांगितले की, “माझं आणि सलमानच्या ब्रेकअप होऊन आज 20 वर्षे झाली आहेत. त्याने मला फसवले आहे. त्यानंतर मी त्याच्यापासून वेगळी झाले.” त्यानंतर तिने सांगितले की, आता 5 वर्ष झालेत मी आणि सलमान खान एकमेकांशी बोललेली नाही. यानंतर तिने सांगितले, “मी चित्रपटात काम करण्यासाठी परत भारतात आलेली नाहीये. माझं सलमान खानसोबत ब्रेकअप झाल्यापासून मी इथल्या कोणत्याच गोष्टीत लक्ष देत नाही.”
सोमी अली ही 1991 मध्ये वयाच्या सोळाव्या वर्षी भारतात सलमान खानसोबत लग्न करण्यासाठी आली होती. पण त्या दोघांचं नातं जास्त काळ टिकू नाही शकले आणि 1999 मध्ये त्या दोघांचे ब्रेकअप झाले. त्यानंतर ती शिक्षण पूर्ण करण्यासाठी यूएसला परत गेली.
पाकिस्तानमध्ये जन्मलेल्या सोमीने बॉलिवूडमध्ये ‘कृष्णा अवतार’ (1993), ‘अंत’ (1994), ‘यार गद्दार’ (1994), ‘तिसरा कौन’ (1994) यासारख्या चित्रपटात काम केले आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-लतादीदींचा सल्ला न ऐकणे हरिहरन यांना पडले होते महागात, १०लाख लोकांसमोर ओढवला होता महाकठीण प्रसंग
-‘आठ वर्ष डेटिंग केल्यानंतर सलमानने मला फसवलं,’ ‘या’ अभिनेत्रीने केलाय गंभीर आरोप