Thursday, March 13, 2025
Home बॉलीवूड ‘अंतिम’ चित्रपटातील ‘या’ गाण्याचा टिझर रिलीझ; सलमान म्हणाला, ‘बाप्पा येत आहेत’

‘अंतिम’ चित्रपटातील ‘या’ गाण्याचा टिझर रिलीझ; सलमान म्हणाला, ‘बाप्पा येत आहेत’

बॉलिवूडचा ‘भाईजान’ सलमान खान आणि त्याचा मेहुणा आयुष शर्मा यांच्या ‘अंतिम: द फाइनल ट्रुथ’ या चित्रपटातील ‘विघ्नहर्ता’ या पहिल्या गाण्याचा टिझर बुधवारी (८ सप्टेंबर) प्रदर्शित झाला आहे. हे पूर्ण गाणं उद्या म्हणजेच गुरुवारी (९ सप्टेंबर) प्रदर्शित होणार आहे. हे गाणं गणपती उत्सवासाठी परिपूर्ण गाणं आहे. या टिझरमध्ये गणेशोत्सवाची भव्यता दाखवण्यात आली आहे.

टिझरवरून हे तर स्पष्ट झाले आहे की, ‘विघ्नहर्ता’ नावाचे हे गाणे ऊर्जा आणि भव्यतेने भरलेले उत्सव गीत आहे. जे गणपतीचे संपूर्ण गुणवैशिष्ट्ये सांगत आहे. ही एक संपूर्ण गाण्याची झलक आहे की, या गाण्याचा ट्रॅक कसा असेल. (Salman Khans Upcoming Antim Movie Vighnaharta Song Teaser Release)

सलमानने अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून हा टिझर शेअर केला आहे. यासोबतच त्याने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “बाप्पा येत आहेत. विघ्नहर्ता गाणे उद्या प्रदर्शित होईल.”

सलमान खानच्या ‘विघ्नहर्ता’ या गाण्याच्या टिझरने प्रदर्शित होताच धुमाकूळ घातला आहे आणि लोकांच्या मनातही या गाण्याबद्दल उत्सुकता निर्माण केली आहे. या छोट्या टिझरमध्ये आपल्याला सलमान खान आणि आयुष शर्मा यांच्या काही आकर्षक आणि मोहक झलक पाहायला मिळतात. ज्यामुळे चाहत्यांचा उत्साह आणखीच वाढत चालला आहे.

‘अंतिम: द फाइनल ट्रुथ’या चित्रपटात सलमान खान आणि आयुष शर्मा पहिल्यांदा मोठ्या पडद्यावर एकत्र दिसणार आहेत. त्याचबरोबर हा चित्रपट सलमान खान फिल्म्स प्रस्तुत आहे. या चित्रपटाचा निर्माता सलमान खान असून या चित्रपटाचे दिग्दर्शन महेश मांजरेकर यांनी केले आहे. ‘अंतिम: द फाइनल ट्रुथ’ ची कथा वेगवेगळ्या विचारसरणी असलेल्या एका पोलीस आणि गुंडाची आहे.

या चित्रपटाची कथा खूप जबरदस्त सांगितली जात आहे. त्याचबरोबर सलमान खान आणि आयुष शर्मा एकमेकांसोबत स्क्रीन शेअर करण्याची ही पहिलीच वेळ असेल. या चित्रपटाचे पोस्टर देखील मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहे. इतकेच नव्हे तर या चित्रपटाच्या पोस्टरलाही चाहत्यांकडून मोठ्या प्रमाणात पसंती मिळत आहे.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-कुरकुरीत पकोडे पाहून शिल्पाच्या तोंडाला सुटले पाणी, एकटीनेच केले फस्त; थ्रोबॅक व्हिडिओ भन्नाट व्हायरल

-सुपरस्टार नागार्जुन यांची सून समंथाने फ्लॉन्ट केले ऍब्ज; पाहून तुम्हीही घालाल तोंडात बोटे

-‘हद्द झाली यार!’ सिद्धार्थ शुक्लाच्या मृत्यूवर व्लॉग बनवणाऱ्या संभावना सेठवर भडकले नेटकरी

हे देखील वाचा