दाक्षिणात्य सिनेसृष्टीत सध्या घटस्फोटाेच्या बातम्यांनी चांगलीच चर्चा रंगली आहे. नुकतेच अभिनेता धनुषनेही पत्नी ऐश्वर्या रजनीकांतशी घटस्फोटाचा निर्णय जाहीर करत सगळ्यांना धक्का दिला. सोशल मीडियावर सध्या याच बातमीची चर्चा आहे. मात्र, दाक्षिणात्य सिनेसृष्टी आणि घटस्फोट हे प्रकरण आता काही नवीन राहिले नाही. याआधीही अनेक दाक्षिणात्य कलाकारांनी आपला सुखी संसार मोडत घटस्फोटाच्या निर्णयाने सगळ्यांना चकित केले आहे. आज या लेखातून जाणून घेऊया अशाच काही प्रसिद्ध घटस्फोटांबद्दल…
१. समंथा रुथ प्रभू आणि नागा चैतन्य (Samantha Ruth Prabhu And Naga Chaitanya)
मागच्या वर्षी आक्टोबर महिन्यात प्रसिद्ध अभिनेत्री समंथा रुथ प्रभू आणि नागा चैतन्यच्या घटस्फोटाच्या बातमीने सगळ्यांना धक्का बसला होता. दोघांनी चार वर्षांचा सुखी संसार मोडत वेगळे होण्याचा निर्णय घेतला. या बातमीने सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली होती. २०१७ मध्ये दोघांचा शाही विवाहसोहळा पार पडला होता. मात्र, त्यांच हे लग्न फार काळ टिकू शकलं नाही. त्यांनी २ ऑक्टोबर, २०२१ रोजी घटस्फोट घेतला.
२. नागार्जुन आणि लक्ष्मी दग्गुबती (Nagarjuna And Lakshmi Daggubati)
सुपरस्टार नागार्जुन हे दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील आघाडीचा लोकप्रिय अभिनेते आहेत. त्यांनी १९८४ मध्ये लक्ष्मी दग्गुबतीसोबत विवाह केला होता. मात्र, त्यांनाही आपला विवाह टिकवता आला नाही. या दोघांनाही १९९० मध्ये घटस्फोटाचा निर्णय घेतला. त्यानंतर नागार्जुन अभिनेत्री अमलाच्या प्रेमात पडले आणि दोघांनीही १९९२ मध्ये विवाह केला.
# KING NAGARJUNA GARU and AMALA garu donated 28 LAKHS for KERALA FLOOD RELIEF FUND # pic.twitter.com/8YUwbl9HMI
— satish (@ANRLegend) August 19, 2018
३. सौंदर्या आणि अश्विन रामकुमार (Soudarya And Ashwin Ramkumar)
अभिनेते रजनीकांत यांची दुसरी मुलगी सौंदर्यानेही लग्नाच्या ६ वर्षानंतर पती अश्विन रामकुमारसोबत २०१६ मध्ये घटस्फोट घेतला होता. यानंतर तिनेही दुसरे लग्न केले. तिचे दुसरे लग्न अभिनेता विशगन वनंगमुडीसोबत २०१९ साली झालं होतं.
५. अमला पॉल आणि एएल विजय (Amala Paul And AL Vijay)
दाक्षिणात्य अभिनेत्री अमला पॉलने चित्रपट निर्माता एएल विजयसोबत २०१४ मध्ये लग्न केले होते. मात्र, अवघ्या दोन वर्षात त्यांनी घटस्फोटाचा निर्णय घेतला. यानंतर विजयने ऐश्वर्या नावाच्या दुसऱ्या मुलीशी विवाह केला.
६. प्रकाश राज आणि ललिता कुमारी (Prakash Raj And Lalitha Kumari)
प्रकाश राज हे दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील एक लोकप्रिय अभिनेते म्हणून ओळखले जातात. त्यांनी १९९४ मध्ये ललिता कुमारीशी संसार थाटला होता. मात्र, २००९ मध्ये त्यांनी घटस्फोट घेत कोरिओग्राफर पोनी वर्माशी दुसरे लग्न केले.
७. पवन कल्याण आणि रेणू (Pawan Kalyan And Renu)
दाक्षिणात्य सुपरस्टार पवन कल्याणचाही या यादीमध्ये समावेश आहे. त्याने २००९ मध्ये रेणूसोबत लग्न केले होते. मात्र, फक्त तीनच वर्षे त्यांचा हा संसार टिकू शकला. त्यांना अकिरा नंदन आणि आद्या अशी दोन मुलेही आहेत.
हेही पाहा- १८ वर्षांचा संसार धनुष- ऐश्वर्याने एका ट्विटर पोस्टने संपवला
८. प्रभू देवा आणि रामलता (Prabhu Deva And Ramlath)
अभिनेता, दिग्दर्शक आणि कोरियोग्राफर प्रभूदेवाने १९९५ मध्ये रामलतासोबत लग्न केल होते.
मात्र, २०१० मध्ये त्यांनीही घटस्फोट घेतला. यानंतर अभिनेत्री नयनतारासोबत त्याचे नाव जोडले गेले होते, पण त्यांचेही ब्रेकअप झाले.
हेही वाचा-