Saturday, September 7, 2024
Home टॉलीवूड समंथाने दुप्पट किमतीत खरेदी केलं पूर्व पती नागा चैतन्यचं घर

समंथाने दुप्पट किमतीत खरेदी केलं पूर्व पती नागा चैतन्यचं घर

साउथ सिनेसृष्टीतील दमदार अभिनेत्री समंथा रुथ प्रभूचे (Samantha Ruth Prabhu) नाव अनेकदा पूर्व पती आणि अभिनेता नागा चैतन्यसाठी (Naga Chaitanya) चर्चेत असते. अलीकडेच बातमी समोर आली आहे की, समंथाने तिचा पूर्व पती नागा चैतन्य याचे हैदराबादमध्ये जुने घर विकत घेतले आहे, ज्यासाठी अभिनेत्रीला दुप्पट किंमत मोजावी लागली.

हैदराबादच्या या घराशी काय आहे समंथाचा संबंध?
साल २०२१ मध्ये समंथाने सोशल मीडियावर तिचा पूर्व पती आणि दक्षिण उद्योगातील प्रसिद्ध कलाकार नागा चैतन्य याच्यापासून घटस्फोटाची घोषणा केली होती. तेव्हापासून या दोन्ही कलाकारांचे मार्ग कायमचे वेगळे झाले आहेत. पण नागा चैतन्यने हैदराबादमधील हे घर खरेदी करताच समंथा आणि नागा चैतन्य यांच्या नावाची चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे. (samantha ruth prabhu bought ex husband naga chaitanya house)

खरं तर, समंथा प्रभूने विकत घेतलेल्या घरात ती तिचा पूर्व पती नागा चैतन्यसोबत राहत होती, पण घटस्फोटानंतर हे घर दोघांच्या संमतीने विकले गेले. त्यानंतर आता समंथाने दुप्पट किंमत मोजून, हे आलिशान घर आपल्या नावावर केले आहे.

बऱ्याच दिवसांपासून समंथाला तिचा अभिनय मोठ्या पडद्यावर दाखवता आलेला नाही. पण ती ‘यशोदा’ चित्रपटातून पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाली आहे. समंथाचा कमबॅक तमिळ चित्रपट ‘यशोदा’ १२ ऑगस्टला थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट एक सस्पेन्स थ्रिलर चित्रपट आहे, जो खरोखर पाहण्यासारखा आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा