अभिनेत्री समंथा जरी दाक्षिणात्य सिनेसृष्टीमधे कार्यरत असली तरी तिची लोकप्रियता, प्रसिद्धी आणि फॅन्स संपूर्ण भारतात आहे. समंथा दाक्षिणात्य इंडस्ट्रीमधील मोठे नाव. काही महिन्यांपूर्वी समंथाने घटस्फोट घेत असल्याचे जाहीर केले आणि सर्वत्र एकच खळबळ उडाली. समंथा आणि नागा चैतन्य हे फॅन्सचे लोकप्रिय कपल होते. त्यांच्या घटस्फोटामुळे अनेकांना धक्का बसला. घटस्फोटानंतर समंथा सतत ट्रोलर्सच्या निशाण्यावर आहे. ती सतत वेगवेगळ्या शुल्लक कारणांमुळे देखील ट्रोल होताना दिसते.
नुकताच पुन्हा एकदा समंथाला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला गेला. मात्र यावेळेस समंथाने ट्रोलर्सला सणसणीत उत्तर देत त्यांचे तोंड बंद केले आहे. ट्विटरवर एका यूजरने समंथाला घटस्फोटित आणि सेकंड हँड आयटम असे म्हटले. एवढेच नाही तर त्या व्यक्तीने असे देखील लिहिले की, समंथा अभिनेता नागा चैतन्याचे टॅक्स फ्री ५० कोटी रुपये हडप करून बसली आहे. ट्रोलर्सकडून केल्या गेलेल्या एवढ्या खालच्या भाषेतील वक्तव्य पाहून देखील समंथा शांत बसली आणि आणि तिने त्याला उत्तर देताना लिहिले, “गॉड ब्लेस योर सोल” अर्थात “देव तुझे रक्षण करो.” समंथाचे हे उत्तर पाहून सोशल मीडियावर तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. सोबतच तिने दिलेल्या उत्तराबद्दल तिच्या हुशारीचे देखील कौतुक होत आहे.
समंथाच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास नुकत्याच प्रदर्शित झालेल्या आणि सुपरहिट ठरत असणाऱ्या ‘पुष्पा’ सिनेमात तिने एक आयटम सॉन्ग केले आहे. हे गाणे तुफान गाजताना दिसत असून, तिचा अंदाज देखील लोकप्रिय होत आहे. समंथा ‘शकुंतलम’ या सिनेमात दिसणार आहे. काही महिन्यांपूर्वीच तिची ‘फॅमिली मॅन २’ ही सिरीज प्रदर्शित झाली. या सिरीजचे आणि तिच्या कामाचे तुफान कौतुक झाले.
हेही वाचा-
सलमान खानने शेअर केलेल्या शर्टलेस फोटोवर त्याच्या एक्स गर्लफ्रेंडने केलेली कमेंट झाली व्हायरल
बर्थडे गर्ल करिश्मा शर्माचा ग्लॅमरस आणि स्टायलिश अंदाज पाहून तुम्हीही व्हाल घायाळ