Friday, March 14, 2025
Home अन्य महाराष्ट्राच्या विनोदवीराला चाहत्याकडून सुंदर गिफ्ट, थेट विनोदाचा बादशहा चार्ली चॅप्लिन…

महाराष्ट्राच्या विनोदवीराला चाहत्याकडून सुंदर गिफ्ट, थेट विनोदाचा बादशहा चार्ली चॅप्लिन…

महाराष्ट्राची हास्यजत्रा हा कार्यक्रम घराघरात लोकप्रिय आहे. कार्यक्रमाची विनोदी मांडणी आणि कलाकारांचा दमदार अभिनय यामुळे या कार्यक्रमाची लोकप्रियता दिवसेदिवस वाढताना दिसत आहे. कार्यक्रमातील प्रत्येक कलाकाराला प्रेक्षकांचे भरभरुन प्रेम मिळते. सध्या या कार्यक्रमातील लोकप्रिय अभिनेते समिर चौघुले यांना त्यांच्या चाहत्याने दिलेल्या सुंदर गिफ्टची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगले आहे. काय आहे हे गिफ्ट चला जाणून घेऊ.

समीर चौघुले (sameer chougule) ही मराठीमधील एक लोकप्रिय अभिनेते म्हणून ओळखले जातात. आपल्या दमदार अभिनयाने आणि विनोदी भूमिकांनी त्यांनी सिनेसृष्टीत एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या विनोदी शैलीचे असंख्य चाहते पाहायला मिळतात. फु बाई फु, कॉमेडीची बुलेट ट्रेन अशा कार्यक्रमांमधून त्यांनी प्रचंड लोकप्रियता मिळवली आहे. सध्या त्यांच्या एका चाहत्याने दिलेल्या गिफ्टची सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे.

समीर चौघुले आपल्या अभिनयाइतकेच सोशल मीडियावरही चांगलेच सक्रिय असतात. आपल्या सोशल मीडियावरुन ते नेहमीच त्यांच्या चाहत्यांशी अनेक फोटो, व्हिडिओ शेअर करताना दिसत असतात. त्यांनी सोशल मीडियावर त्यांच्या चाहत्याने दिलेल्या या सुंदर गिफ्टबद्दलची पोस्ट शेअर केली आहे. या चाहत्याने समीर चौघुले यांची हुबेहुब रांगोळी काढली आहे. इतकेच या चाहत्याने समीर चौघुले यांच्याशेजारी विनोदाचा बादशहा चार्ली चॅप्लिनचीही रांगोळी काढली आहे.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Samir Choughule (@samirchoughule)

मदन कावळे नावाच्या या  चाहत्याने दिलेल्या सुंदर गिफ्टमुळे समीर चौघुले चांगलेच भावूक झाले आहेत. त्यांनी हा फोटो शेअर करत “चाहत्यांचे प्रेम हीच खरी ऊर्जा असते..गोरेगाव येथे रांगोळी प्रदर्शनात श्री. मदन कावळे यांनी माझी अतिशय सुंदर रांगोळी काढली…मनापासून आभार आणि प्रेम,” अशा शब्दात आपला आनंद व्यक्त केला आहे. सध्या त्यांची ही पोस्ट चांगलीच व्हायरल होत आहे.

हे देखील वाचा