फिरोज खानच्या गाडीला टक्कर मारून ‘विलन’ बनले शक्ती कपूर; काय आहे अभिनेत्याचं खरं नाव?

चित्रपटांमध्ये दाखवण्यात येणाऱ्या हिरोच्या कामगिरीमध्ये अनेक वेळा खलनायकाची भूमिका प्रेक्षकांना जास्त आवडते. असे अनेक कॉमेडी आणि दमदार खलनायक आहेत ज्यांच्या झलकची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत असतात. या खलनायकांपैकीच एक खलनायक आहेत शक्ती कपूर. शक्ती कपूर यांनी गेली अनेक दशके प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे. शक्ती कपूर शुक्रवार (३ सप्टेंबर) त्यांचा वाढदिवस साजरा करतात. वाढदिवसानिमित्त या खलनायकाच्या आयुष्यातील काही खास गोष्टी जाणून घेऊ.

शक्ती कपूर यांचा जन्म ३ सप्टेंबर १९५२मध्ये दिल्ली येथे झाला. त्यांना लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती. त्यांनी आपलं महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केल्यानंतर फिल्म ऍंड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियामधून अभिनयाचे शिक्षण पूर्ण केले. शक्ती कपूर यांनी आजवर अनेक हास्यास्पद आणि नकारात्मक भूमिका साकारल्या आहेत. त्यांच्या या नकारात्मक खलनायकाच्या भूमिकांना प्रेक्षकांनी चांगलंच डोक्यावर घेतलं होतं. चित्रपटांमध्ये काम मिळवण्यासाठी त्यांना सुरुवातीला फिरोज खान यांची खूप मदत झाली. (Villain Shakti Kapoor birthday special know professional life and personal life)

फिरोज खान यांच्याशी भांडण
शक्ती कपूर यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितले होते की, “मी माझी गाडी घेऊन बाहेर चाललो होतो. त्यावेळी एका मर्सिडीज गाडीला माझी गाडी धडकली. मला राग आला मी बाहेर येऊन त्या गाडीवर मारू लागलो. परंतु त्या गाडीमध्ये फिरोज खान बसले होते. माझी त्यांच्यावर नजर पडताच मी त्यांच्याकडे चित्रपटांमध्ये काम मागू लागलो.” शक्ती कपूर यांनी सांगितलेल्या या किस्स्यावरून फिरोज खान यांचे शक्ती कपूर यांच्या आयुष्यातील स्थान काय आहे हे समजते. त्यांच्या चित्रपटातील यशामध्ये फिरोज खान यांचे देखील मोलाचे योगदान आहे. त्यानंतर फिरोज खान यांनी शक्ती कपूर यांच्यामध्ये असलेलं नावीन्य आणि चतुराई पाहून त्यांना ‘कुर्बानी’ या चित्रपटात खलनायकाची भूमिका दिली. साल १९८३ मध्ये हा चित्रपट प्रदर्शित करण्यात आला.

नाव काय आहे शक्ती कपूर यांचे खरे?
साल १९८३ मध्ये सुनील दत्त संजू बाबासाठी ‘रॉकी’ चित्रपटाची तयारी करत होते. त्यासाठी त्यांना एक दमदार आणि विनोदी खलनायकाची गरज होती. सुनील दत्त यांची नजर तेव्हा सुनील सिकंदरलाल यांच्यावर पडली. त्यांनी सुनील सिकंदरलाल यांची खलनायकाच्या भूमिकेसाठी निवड ही केली. परंतु सुनील दत्त यांना सुनील सिकंदरलाल हे नाव आवडले नाहीत. एका खलनायकाचे नाव त्याच्या अभिनयाप्रमाणे असावे असे त्यांना वाटले. त्यामुळे त्यांनी सुनील सिकंदरलाल यांना नाव बदलण्याची अट घालून, त्यांचे नाव शक्ती कपूर ठेवले.

आपल्या अभिनयाच्या कारकिर्दीमध्ये ‘कुर्बानी’ आणि ‘रॉकी’ या चित्रपटांतूनच शक्ती कपूर यांना प्रेक्षक खलनायकाच्या रूपात ओळखू लागले होते. त्यांनी यानंतर अनेक चित्रपटांमध्ये खलनायकाची भूमिका साकारली. ‘हिम्मतवाला’, ‘हीरो’ अशा अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी नकारात्मक भूमिका केल्या आणि त्या सर्वांना प्रेक्षकांची चांगली पसंती मिळाली. त्यानंतर काही दिवसांनी त्यांना अशा खलनायकाच्या भूमिका साकारून कंटाळा आला होता. त्यामुळे त्यांनी गोविंदासोबत चित्रपटांमध्ये विनोदी भूमिका साकारायला सुरुवात केली. यामध्ये ‘राजा बाबू’, ‘बाप नंबरी बेटा दस नंबरी’ अशा अनेक चित्रपटांचा समवेश आहे.

शक्ती कपूर यांची मुलगी श्रद्धा कपूर ही देखील अभिनय क्षेत्रात यशाचं शिखर गाठत आहे. काही दिवसांपूर्वी शक्ती कपूर यांनी तिच्या लग्नाविषयी आपलं मत व्यक्त केलं होत. शक्ती कपूर म्हणाले होते की, “आज काल सर्व मुले आपल्या आवडीचा जोडीदार स्वतःच निवडतात आणि लग्न करतात. रोहनला मी चांगलंच ओळखतो. तो आमच्या एका नातेवाईकाचा मुलगा आहे. आम्ही अनेक समारंभांमध्ये भेटलो आहे. तो अनेकदा आमच्या घरीही आला आहे. परंतु त्याने माझ्याकडे अद्याप माझ्या मुलीचा हात मागितलेला नाही. परंतु जर त्या दोघांना लग्न करायचे असेल तर माझी काहीच हरकत नाही.”

शक्ती कपूर यांचे खलनायकाच्या भूमिकेतील अनेक चित्रपट रुपेरी पडद्यावर खूप गाजले. साल १९९५ मध्ये त्यांना उत्तम विनोदी कलाकार या पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आले आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही नक्की वाचा-
आगामी चित्रपटासाठी रणदीप हूड्डाने केले तब्बल २५ किलो वजन कमी, पाहून तुम्हालाही वाटेल आश्चर्य

ऐश्वर्याशी झालेल्या ब्रेकअपनंतर विवेकने एका मंत्र्याच्या मुलीसोबत थाटला संसार; आज जगतोय सुखी आयुष्य
सलमान खानशी ‘पंगा’ घेतल्याने विवेक ओबेरॉयच्या करिअरचे वाजले होते तीन- तेरा

Latest Post