बॉलिवूडमध्ये येऊन आपले नाव कमावणे वाटते तितके सोपे कधीच नसते. काही कलाकारांमध्ये ती प्रतिभा असते, ज्याच्या जोरावर ते आपले एक वेगळेच स्थान निर्माण करतात. त्याच कलाकारांमध्ये समावेश होतो अभिनेत्री संदीपा धरचा. संदीपा फक्त तिच्या अभिनयासाठीच नाही, तर डान्ससाठीही प्रसिद्ध आहे. बुधवारी (०२ फेब्रुवारी) संदीपा आपला ३३ वा वाढदिवस साजरा करत आहे. तिच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊया तिच्या आयुष्यातील काही खास गोष्टी…
पर्यटनासाठी विशेष प्रसिद्ध असलेल्या श्रीनगरमध्ये २ फेब्रुवारी, १९८९ रोजी संदीपा धरचा (Sandeepa Dhar) जन्म झाला आहे. ती एक प्रशिक्षित डान्सर देखील आहे. तिने डान्सची अनेक बक्षीसे देखील मिळवली आहेत. तिने ४ वर्षे ‘श्यामक डावर’ आणि ‘टेरेंस लुईस’ यांच्याकडे जैज आणि कंटेम्परेरी प्रशिक्षण घेतलं आहे. अभिनेत्री संदीपा हिने २०१० साली राजश्री प्रॉडक्शनचा हिंदी चित्रपट ‘इसी लाईफ में’ यामधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. या चित्रपटात संदीपासोबत अभिनेता ‘अक्षय ओबेरॉय’ हा मुख्य भूमिकेत होता.
खूप कमी चाहत्यांना ही गोष्ट माहित आहे की, संदीपा ही कोट्यवधी संपत्तीची मालकीण आहे. ती अगदी ऐशोआरामात आयुष्य जगते. संदीपाला उन्हाची ऍलर्जी असल्यामुळे ती नेहमी सावलीतच असते. एका बाजूने बघायला गेलं, तर तिचं आयुष्य ती एकदम अभिनेत्री राणीसारखं जगत आहे.
संदीपाचं प्राण्यांवर खूप प्रेम आहे. याचं एक उदाहरण देखील आपल्याला पाहायला मिळालं आहे. मुंबईमध्ये जेव्हा जोरात पाऊस पडत होता, तेव्हा त्या पावसात एक कुत्रा थंडीने कुडकुडत होता. त्यावेळी संदीपाने त्या कुत्र्याला पाहिले आणि त्याला स्वतः सोबत आपल्या घरी घेऊन गेली. त्यानंतर तिने त्या कुत्र्याची खूप काळजी घेतली.
हेही पाहा- ‘या’ Tollywood कलाकारांच्या अभिनयाला तोडच नाही, Bollywood मध्येही दाखवलाय जलवा
संदीपाच्या कामाबद्दल बोलायचं झालं, तर तिने ‘हिरोपंती’ या सिनेमात ‘टायगर श्रॉफ’सोबत काम केले आहे. तसेच तिने सलमान खानच्या ‘दबंग २’ या सिनेमामध्ये देखील किमयाची भूमिका साकारली आहे. तसेच संदीपाने काही दिवसांपूर्वी ओटीटीवर रिलीज झालेल्या ‘अभय’ या सीरिजमध्ये देखील महत्त्वाची भूमिका निभावली. या सीरिजमध्ये कुणाल खेमू हा मुख्य भूमिकेत होता. संदीपा आताच आलेल्या क्राईम ड्रामावर आधारित ‘मुम भाई’ या सीरिजमध्ये दिसली होती.
संदीपाला काय आवडतं?
संदीपा धर ही खाद्यप्रेमी आहे. तिला फ्रेंच फ्राईज, पोटॅटो वेजेस आणि राजमा चावल खायला आवडतात. ती शाकाहारी आहे आणि तिला बटाट्यापासून बनवलेले पदार्थ खायला आवडतात. ड्रिंक्सबद्दल सांगायचं झालं, तर तिला मोजिटो आवडते.
संदीपाचे आवडते कलाकार कोणते?
बॉलिवूड कलाकारांमध्ये संदीपाला फक्त सर्वात प्रतिभावान, प्रसिद्ध अभिनेत्री माधुरी दीक्षित नेने खूप आवडते. हॉलिवूड कलाकारांबद्दल सांगायचं झालं, तर तिला लिओनार्डो डी कॅप्रियो हा सुपरस्टार आवडतो.
अशा या गुणसंपन्न अभिनेत्रीला दैनिक बोंबाबोंबकडून वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…!!!
हेही वाचा-
- बिग बॉसची ट्रॉफी न जिंकता देखील ‘हे’ स्पर्धक ठरले खरे बाजीगर आणि मिळवली तुफान लोकप्रियता
- करोडो रुपयांची मालकीण; मोठी संपत्ती आणि वय केवळ ३२ वर्ष, जाणून घ्या महाराणीसारखं आयुष्य जगणाऱ्या ‘या’ अभिनेत्रीबद्दल
- Happy Birthday: कॉमेडी करून ब्रह्मनंदम यांनी कमावलंय नाव, एका चित्रपटासाठी घेतात तब्बल ‘इतकं’ मानधन