हटके डान्स व्हिडिओ शेअर करत संदीपा धर पुन्हा आली चर्चेत; चाहत्यांनी पाडला लाईक्सचा पाऊस!

sandeepa dhar once again shared her video on glamorous look see here


बॉलिवूड अभिनेत्री संदीपा धर अभिनयासोबतच, तिच्या उत्कृष्ट डान्स कौशल्यासाठीही ओळखली जाते. तिचे डान्स व्हिडिओ दरदिवशी सोशल मीडियावर व्हायरल होत राहतात. संदीपा धर आता तिच्या एका डान्स व्हिडिओ सह पुन्हा चर्चेत आली आहे. मात्र हा व्हिडिओ थोडा हटके आहे.

संदीपाचा हा व्हिडिओ चाहत्यांकडून चांगलाच पसंत केला जात आहे, जो तिने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. यामध्ये ती दोन ड्रेसमध्ये दिसली आहे. पहिल्यांदा जेव्हा संदीपा डान्स करत कॅमेऱ्यासमोर येते, तेव्हा तिने निळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. त्याचप्रमाणे जेव्हा ती दुसऱ्यांदा समोर येते, तेव्हा तिने हलक्या चंदेरी रंगाचा ड्रेस घातलेला पाहायला मिळाला.

सोबतच तिचे डान्स मूव्ह्ज अप्रतिम आहेत. यातील संदीपाच्या अदा पाहून चाहते नव्याने तिच्या प्रेमात पडत आहे. व्हिडिओ शेअर करत संदीपाने कॅप्शनमध्ये लिहिले आहे, “माझी लॉकडाउन सुपर पॉवर. मी लेविटेटिंग आहे!” नेहमीप्रमाणेच तिचा या व्हिडिओलाही नेटकऱ्यांकडून भरभरून प्रतिसाद मिळत आहे. काही तासांपूर्वी शेअर केलेल्या या व्हिडिओला आतापर्यंत ३३ हजाराहून अधिक युजर्सने लाईक केले आहे.

संदीपा धरने तिच्या कारकीर्दीची सुरूवात २०१० मध्ये, राजश्री प्रॉडक्शनच्या ‘इसी लाईफ में’ या चित्रपटापासून केली होती. संदीपासोबत अशोक ओबेरॉय या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसला होता. या चित्रपटातील तिच्या अभिनयाचे प्रेक्षक आणि समीक्षकांनी बरेच कौतुक केले. याशिवाय तिला या चित्रपटासाठी स्टारडस्ट, फिल्मफेअर, स्क्रीन अवॉर्ड्स ही नामांकनेही मिळाली. यानंतर ती सलमान खान अभिनित ‘दबंग २’ या चित्रपटात दिसली. टायगर श्रॉफचा पदार्पण चित्रपट ‘हीरोपंती’ मध्येही संदीपाने काम केले आहे. यात तिने क्रिती सेननच्या बहिणीची भूमिका साकारली होती.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…


Leave A Reply

Your email address will not be published.