चंदेरी पडद्यावर सध्या लगीन सराई सुरू आहे. अनेक कलाकार २०२१ मध्ये लग्नबंधनात अडकले आहेत. मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकारांनी लग्न केले आहे. अशातच मराठी टेलिव्हिजनवरील लोकप्रिय मालिका ‘सांग तू आहेस का ‘(Sang too ahes ka) या मालिकेतील अभिनेत्री भाग्यश्री दळवी (Bhagyashree Dalavi) हिचे लग्न झाले आहे. काही दिवसांपूर्वी भाग्यश्रीचा साखरपुडा झाला आहे. अशातच तिचे लग्न झाल्याची बातमी आली आहे. तिच्या लग्नाचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अनेक कलाकारांनी तिच्या लग्नात हजेरी लावली होती.
भाग्यश्रीने प्रतीकसोबत लग्न केले आहे. त्यांचा साखरपुडा देखील मोठ्या थाटामाटात झाला होता. त्यांच्या साखरपुड्याला सिद्धार्थ चांदेकरसोबत मालिकेतील अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. तिचे लग्न देखील अगदी थाटात पार पडले आहे. तिच्या लग्न झाल्याची अजूनही तिने अधिकृत माहिती दिली नाही. तिने लग्नाचा एकही फोटो सोशल मीडियावर शेअर केला नाही. परंतु काही कलाकारांनी लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. (sang too ahes ka serial’s actress bhagyashree dalavi get married)
या फोटोमध्ये आपण पाहू शकतो की, तिने पारंपारिक पद्धतीने लग्न केले आहे. लग्नात तिने पिवळ्या रंगाची नऊवारी साडी नेसली आहे. तसेच नवरीचा सगळा साज-शृंगार केला आहे. तसेच तिच्या पतीने पांढऱ्या रंगाची शेरवानी घातली आहे. ते दोघेही या फोटोमध्ये खूपच छान दिसत आहे. तिच्या लग्नाला विराजस कुलकर्णी, शिवानी रांगोळे, सुरेखा तळवलकर आणि गुरु दिवेकर यांनी हजेरी लावली होती. त्यांचे अनेक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अनेकजण त्यांना सोशल मीडियावर शुभेच्छा देत आहेत.
भाग्यश्रीने ‘सांग तू आहेस का’ मालिकेत सिद्धार्थ चांदेकरच्या बहिणीचे दीप्ती या नावाचे पात्र निभावले होते. मालिकेतील त्या भावा-बहिणीची केमिस्ट्री सगळ्यांना खूप आवडली. मालिकेत सिद्धार्थ चांदेकर आणि शिवानी रांगोळे हे कलाकार मुख्य भूमिकेत होते. मालिकेची कहाणी प्रेक्षकांना खूप आवडली होती. खरे प्रेम कधीही आणि कुठेही मिळते ही कहाणी या मालिकेत दाखवली होती.
हेही वाचा :
शिव ठाकरे आणि वीणा जगतापचे झाले ब्रेकअप? शिवच्या ‘त्या’ उत्तराने रंगली चर्चा
अमिताभ बच्चनपासून ते अनुपम खेरपर्यंत ‘या’ कलाकारांचे अकाऊंट देखील झाले आहे हॅक