Saturday, June 29, 2024

सामन्यादरम्यान भारतीय प्रेक्षकांनी शोएब मलिकसोबत केलं ‘असं’ कृत्य, ते पाहून पत्नी सानिया मिर्झाने दिली प्रतिक्रिया

भारतीय टेनिसपटू सानिया मिर्झाने नुकताच भारत-पाकिस्तान टी-२० विश्वचषक सामन्याचा एक व्हिडिओ शेअर केला आहे, जो इंटरनेटवर खूप व्हायरल होत आहे. या सामन्यात पाकिस्तानने भारताचा पराभव केला होता. मात्र या सामन्यातील एक मजेशीर व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेत आहे.

यातील मजेची गोष्ट अशी की, सामन्यादरम्यान फिल्डिंगसाठी सीमारेषेवर पोहोचलेला पाकिस्तानी क्रिकेटपटू आणि सानिया मिर्झाचा पती शोएब मलिकला पाहून चाहते भलतेच उत्साहित झाले होते. यावेळी ते शोएबला ‘जिजा जी-जिजा जी’ म्हणू लागले. भारताची मुलगी सानिया मिर्झाशी लग्न केल्यामुळे, चाहत्यांनी शोएबला हा टॅग दिला गेला आहे. (sania mirza react on indian audience loud address to shoaib malik as jeeja ji during india pakistan t20 world cup)

त्याचबरोबर हा व्हायरल व्हिडिओ शेअर करताना सानिया मिर्झाने यावर तिची मजेशीर प्रतिक्रिया दिली आहे. व्हिडिओ शेअर करत सानियाने हार्ट आणि मोठ्याने हसणारे इमोजी पोस्ट केले आहेत. सानियाची ही प्रतिक्रिया पाहून, तिला हा व्हिडिओ खूप आवडल्याचे स्पष्ट झाले आहे. सानिया मिर्झा आणि शोएब अख्तर ही जोडी खूप चर्चेत असते. भारत आणि पाकिस्तानसारख्या देशाला एक सुंदर प्रेमकथा देणाऱ्या या जोडप्याची सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, लग्नानंतरही त्यांचे हृदय आपापल्या देशांसाठीच धडधडते.

वैयक्तिक आयुष्याशिवाय दोघेही जेव्हा मैदानात उतरतात, तेव्हा ते फक्त आपल्या देशासाठी खेळतात. शोएब हा पाकिस्तानचा यशस्वी खेळाडू आहे, तर सानिया मिर्झाने भारताला टेनिस जगतात अनेक मोठे यश मिळवून दिले आहे. सानिया मिर्झा आणि शोएबला एक मुलगाही आहे. अनेकदा दोघे सोशल मीडियाच्या माध्यमातून एकमेकांसोबतचे मनमोहक फोटो शेअर करत असतात.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘होय, सामना संपल्यानंतर भारत जिंकला आहे…’, अभिनेता सोनू सूदकडून विराट कोहलीचे कौतुक

-क्रिकेटप्रेमी असणाऱ्या उर्वशी रौतेलाने बुक केले भारत पाकिस्तानच्या सामन्याचे गोल्डन तिकीट

-महेंद्रसिंग धोनी करणार बॉलिवूडमध्ये पदार्पण? चाहत्यांच्या इच्छेवर क्रिकेटपटूने दिली ‘अशी’ प्रतिक्रिया

हे देखील वाचा