आजच्या काळात नवरा आणि बायको सोबतच उभे राहून आपापले करिअरपुढे नेण्यासाठी प्रयत्नशील असतात. सामान्य जोडपे असले काय आणि सेलिब्रिटी जोडपे असले काय, सर्वच पती- पत्नी एकमेकांच्या साथीने आपले करिअर घडवताना दिसतात. याला कलाकार देखील अपवाद नाहीत. आज कलाकारांइतकेच त्यांच्या पत्नी देखील लोकप्रियतेच्या बाबतीत मागे नाही. लोकप्रियतेच्या बाबतीत अभिनेत्यांनाही टक्कर देणाऱ्या या कलाकारांच्या पत्नी सोशल मीडियावर देखील प्रसिद्ध आहे. यातीलच एक मोठे नाव म्हणजे मान्यता दत्त. (Sanjay Dutt Wife Maanayata Dutt Shares Workout Video)
बॉलिवूडचा सुपरस्टार असलेल्या संजय दत्तची पत्नी मान्यता दत्त देखील प्रचंड लोकप्रिय आहे. सोशल मीडियावर लाखो फॉलोवर्स असणारी मान्यता नेहमीच तिचे, कुटुंबाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते. एक गृहिणी न राहता आपले करिअर सांभाळणारी मान्यता एक अभिनेत्रीसोबतच संजय दत्त प्रॉडक्शनची सीईओ देखील आहे.
मान्यता दत्त ४२ वर्षांची असली, तरीही तिला पाहून कोणीही तिच्या वयाचा अंदाज लावू शकणार नाही. अशाप्रकारे तिने स्वत:ला फिट आणि हेल्दी ठेवले आहे. नुकताच मान्यताने वर्कआऊट करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करत तिच्या फिटनेसचे गुपित सांगितले आहे. दररोज न चुकता व्यायाम हेच तिच्या फिट बॉडीचे रहस्य आहे. मान्यताचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगला व्हायरल झाला आहे. या व्हिडिओला तिच्या फॅन्सकडून भरपूर लाईक्स आणि कमेंट्स देखील मिळत आहेत.
मान्यता दत्तबद्दल सांगायचे झाले, तर तिचे खरे नाव दिलनवाज शेख आहे. मुंबईत जन्मलेली मान्यता दुबईमध्ये मोठी झाली. कामाच्या शोधात मुंबईत आल्यानंतर तिला प्रकाश झा यांच्या ‘गंगाजल’ सिनेमात एक डान्स नंबर करायची संधी मिळाली. इथूनच तिचे करिअर सुरु झाले. करिअरमध्ये पुढे जात असतानाच तिची आणि संजय दत्तची भेट झाली आणि कालांतराने ते दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले. २००८ साली त्यांनी एका खासगी समारंभात लग्नगाठ बांधली. आज संजय आणि मान्यता दोन जुळ्या मुलांचे आई- वडील असून, मान्यता संजय दत्तच्या संपूर्ण प्रॉडक्शन हाऊसची जबाबदारी सांभाळते.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-‘आई शानदार असते!’ मुलाला कुशीत घेऊन आईने एका हाताने घेतला भन्नाट कॅच; अनुष्का शर्माही झाली इम्प्रेस