‘संजू बाबा’ची पत्नी मान्यताने सुंदर फोटो शेअर करत दिल्या ईदच्या शुभेच्छा! साध्या मेकअपमध्येही दिसतेय आकर्षक


कलाकार नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असतात. सोशल मीडियाच्या माध्यमातून कलाकरांना लोकप्रियता देखील तुफान मिळते. कलाकारांना मिळणारी लोकप्रियता सोशल मीडियाच्या येण्यामुळे त्यांच्यापुरती मर्यादित न राहता त्यांच्या परिवाराला देखील आपोआप मिळायला लागते. या सोशल मीडियामुळेच मोठमोठ्या कलाकारांच्या पत्नींना लोकप्रियता मिळाली आणि त्या प्रकाशझोतात आल्या. आज कलाकारांइतक्याच त्यांच्या पत्नी देखील प्रचंड लोकप्रिय आहेत. अशीच एक स्टार पत्नी आहे मान्यता दत्त.

अभिनेता संजय दत्तची पत्नी असलेली मान्यता नेहमी सोशल मीडियावर सक्रिय असते. मान्यता नेहमी तिचे आणि तिच्या मुलांसोबतचे, पतीसोबतचे अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर करताना दिसत असते. आज ईद साजरी केली जात आहे. बॉलिवूडमधील सर्वच कलाकार आज सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्वांना ईदच्या शुभेच्छा देताना दिसत आहेत. यात मान्यता देखील मागे नाही. तिने देखील तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून हटके स्टाईलमध्ये सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत.

मान्यताने पेस्टल ग्रीन रंगाच्या पारंपारिक ड्रेसमधील तिचा एक सेल्फी पोस्ट करत सर्वांना ईदच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तिचा हा लूक आणि त्यावर तिने केलेला साधा मेकअप खूपच आकर्षक आणि लक्षवेधी ठरत आहे. मान्यताने तिच्या या पोस्टमध्ये लिहिले, “या ईद-अल-अदहाच्या दिवशी तुम्हा सर्वांना शांती मिळो. तुम्ही सर्वांना स्वर्गासारखी जाणीव होवो. ईद तुमच्या जीवनात आनंद घेऊन येवो. ईद मुबारक #प्रेम#कृपा #सकारात्मकता #दत्तों #सुंदर जीवन #धन्यवाद.”

संजय दत्तची पत्नी असलेल्या मान्यताचे खरे नाव दिलनवाज शेख असून, तिचा जन्म जरी मुंबईचा असला तरी तिचे बालपण दुबईत गेले. कामाच्या निमित्ताने मान्यता मुंबईत आली आणि तिला प्रकाश झा यांच्या ‘गंगाजल’ सिनेमात एक खास गाणे करण्याची संधी मिळाली. त्यानंतर तिने स्वतःचे नाव मान्यता ठेवले. संजय आणि मान्यता यांची भेट २००२ साली झाली आणि २००६ साली त्यांनी लग्न केले. आज या दोघांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-प्रिया वारियरचा देशात नाही तर परदेशात डंका! साडी नेसून रशियाच्या रस्त्यांवर केला भन्नाट डान्स

-‘सैंया झूठों का बड़ा सरताज निकला’ गाण्यावर थिरकली ऋचा चड्ढा; पब्लिक डिमांडवर शेअर केला व्हिडिओ

-पिवळ्या रंगाच्या ब्लेझर सूटमध्ये श्रुती मराठे दिसतेय खूपच आकर्षक, पाहून चुकेल तुमच्याही हृदयाच्या ठोका


Leave A Reply

Your email address will not be published.