Friday, July 5, 2024

‘हिरामंडी’साठी संजय लीला भन्साळी घेत आहेत भरमसाठ फी, २०० कोटींना तयार होणार चित्रपट!

संजय लीला भन्साळी (sanjay leela bhansali) यांच्या गंगूबाई काठियावाडी या चित्रपटाला मिळालेल्या जबरदस्त यशानंतर पुन्हा एकदा बॉलिवूडचे दिग्गज दिग्दर्शक त्यांच्या दुसऱ्या प्रोजेक्टसाठी चर्चेत आले आहेत. ‘गंगुबाई काठियावाडी’ नंतर तो ‘हिरामंडी’ दिग्दर्शित करत आहे. हा चित्रपट त्याचे बजेट, स्टार कास्ट आणि फीसबाबत चर्चेत आहे. गेल्या वर्षीच OTT प्लॅटफॉर्म Netflix ने या चित्रपटाची घोषणा केली होती. हे स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म या प्रकल्पाची निर्मिती करणार आहे. हा चित्रपट भरघोस बजेटमध्ये तयार केला जात आहे आणि स्वत: संजय लीला भन्साळी देखील चित्रपटाच्या दिग्दर्शनासाठी भरमसाठ फी घेत आहेत.

‘हिरमंडी’ बनवण्यासाठी नेटफ्लिक्स २०० कोटी रुपये खर्च करणार आहे. या चित्रपटात अनेक मोठे स्टार्सही दिसणार आहेत. चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी संजय लीला भन्साळी यांच्या खांद्यावर आहे, ज्यासाठी ते भरमसाठ फी आकारत आहेत.

हा चित्रपट मल्टीस्टारर असणार आहे. या चित्रपटात सोनाक्षी सिन्हा, मनिषा कोईराला, हुमा कुरेशी आणि ऋचा चढ्ढा दिसणार असल्याचं वृत्त आहे. या चित्रपटासाठी बाकी कलाकार किती पैसे घेतात हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

काही दिवसांपूर्वी माधुरी दीक्षित मुख्य भूमिकेत दिसणार असल्याच्या बातम्या आल्या होत्या. यासाठी मुमताजशीही संपर्क साधला जात होता, परंतु ती पुनरागमन करण्याच्या मूडमध्ये नसल्याने तिने ही ऑफर नाकारली. त्याचवेळी आलियाने संजय लीला भन्साळींच्या या चित्रपटात फुकटात काम करण्यास होकार दिला होता, मात्र यात तिची कोणतीही भूमिका नाही.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

हे देखील वाचा