सिनेसृष्टीमधे मोठ्या प्रमाणावर बायोपिक बनतात. समाजात मोठे कार्य केलेल्या, अथवा विशिष्ट क्षेत्रात अतुलनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तीवर बायोपिक काढून त्याच्या कार्याबद्दल जगाला माहिती करून दिले जाते. बॉलिवूडमध्ये आणि मराठीमध्ये मोठ्या प्रमाणवर बायोपिक बनतात आणि गाजतात देखील. कला, क्रीडा, सामाजिक, शिक्षण, राजकारण आदी अनेक क्षेत्रातील दिग्गज व्यक्तींवर आतापर्यंत बायोपिक बनल्या आहेत. आता अजून एका राजकीय नेत्याच्या बायोपिकच्या चर्चा सध्या चालू आहे.
View this post on Instagram
शिवसेनेचे जेष्ठ नेते आणि खासदार असलेल्या संजय राऊत यांनी काही महिन्यांपूर्वी पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी तुरुंगवास भोगला. २०२२ वर्षात महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर सत्तापालट झाले. त्यानंतर शिवसेनेचे ठाकरे गट आणि शिंदे गट असे दोन गट पडले. शिंदे गट सत्तेत आल्यानंतर राऊत यांना तुरुंगवास झाला. बाहेर आल्यानंतर त्यांनी सरकारवर मोठी आगपाखड सुरु केली. मूळचे एक पत्रकार असलेल्या संजय राऊत यांनी हळूहळू राजकारणात प्रवेश केला. संजय राऊत यांनी एका मुलाखतीमध्ये सांगितले की, लवकरच ‘ठाकरे’ या सिनेमाचा दुसरा भाग येणार आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबतच शिवसेनेचे नेते धर्मवीर आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित सिनेमा २०२२ साली आला आणि त्याने अमाप लोकप्रियता मिळवली.
लवकरच आनंद दिघे यांच्या आयुष्यावर आधारित ‘धर्मवीर’ सिनेमाचा दुसरा भाग येणार असल्याचे निर्मात्यांनी सांगितले यावर संजय राऊत यांनी भाष्य करत त्यांनी सांगितले, “धर्मवीर चित्रपटाच्या पहिल्या भागात आनंद दिघे यांचे निधन झाले असल्यामुळे आता दुसऱ्या भागात धर्मवीर कोण असेल हे पाहू.” यावेळी त्यांना त्यांच्या जीवनावर आधारित बायोपिक भविष्यात तयार झाली तर त्यात कोणी त्यांची भूमिका निभवावी असे तुम्हाला वाटते? आणि तुमच्या बायोपिकचे नाव काय असेल? याला उत्तर देताना ते म्हणाले, ‘सिनेमात माझी भूमिका मीच करणार’, माझ्या बायोपिकचे नाव ‘संजय उवाच’ असे असेल.
आता भविष्यात खरंच त्यांच्यावर सिनेमा बनणार का आणि त्यात कोण भूमिका साकारेल? हे बघणे महत्वाचे असेल.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
अरेरे कसलं ते दुर्देव! अभिनेता ऋतिक रोशनने ज्या चित्रपटांची ऑफर धुडकावली तेच ठरलेत सुपरहीट
हॅपी बर्थडे कल्की! अनुराग कश्यपसोबत ब्रेकअपनंतर बॉयफ्रेंडच्या मुलीला दिला जन्म, वाचा अभिनेत्रीबद्दल