Tuesday, March 5, 2024

शरद पोंक्षेंच्या ‘त्या’ निर्णयावर संकर्षणने मांडले मत, म्हणाला,’…हे फार धाडसाचं काम आहे’

अभिनय क्षेत्रातील लोकप्रिय अभिनेत्यांमधील एक म्हणजे संकर्षण कऱ्हाडे. त्याच्या उत्तम अभिनयाने त्याने चित्रपटसृष्टीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्याचसोबत नाटकां, मालिका आणि चित्रपट अशा तिन्ही माध्यमांमधून त्याचा चाहता वर्ग निर्माण केला आहे.संकर्षणचं त्याच्या कामावर प्रचंड प्रेम आहे. त्याच्या या नाटकप्रेमामुळे तो फक्त महाराष्ट्रातंच नाही तर विदेशातंही प्रसिद्ध आहे. मध्यंतरीच त्याच्या नियम व अटी लागु या नाटकाचे भारताबाहेरही प्रयोग झाले आहेत. अशा या नाटकप्रेमी संकर्षणचं नाटकावर प्रेम असल्याने इतर नाचककारांवर आणि नाटकांवर लक्षंही असतं, अशातंच त्याने शरद पोक्षेंच्या ‘मी नथुराम गोटसे बोलतोय’ या नाटकाविषयी एक प्रतिक्रिया दिली आहे.

संकर्षण सोशल मिडियावर नेहमीच चक्रीय असतो. तो नेहमी नवनवीन पेस्ट करत त्याच्या आयुष्याचे अपडेट चाहत्यांना देतो आणि चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असतो. त्याने नुकतीच नाटक विश्वाशी संबंधीत एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्याने शरद पोक्षेंच्या ‘मी नथुराम गोडसे बोलतोय'(Mi Nathuram Godase Boltoy) हे नाटक बंद झाल्याबद्दल त्याचे मत व्यक्त केले आहे.

संकर्षणने केलेल्या या पोस्टमध्ये एक विडियो आहे. या विडियोत संकर्षण म्हणतो ,””नमस्कार माझं नाव संकर्षण कऱ्हाडे, मी हा व्हिडिओ नथुराम गोडसे या नाटकाच्या संपूर्ण टीमसाठी आणि शरद पोंक्षे सर यांच्यासाठी करत आहे. तुम्ही आज हे नाटक ही कलाकृती पूर्ण करताय.. थांबवताय, संपवताय असं मी चुकूनही म्हणणार नाही. तुम्ही आज ही कलाकृती पूर्ण करताय आणि याच्यानंतर या कलाकृतीचे प्रयोग आम्हाला बघायला मिळणार नाहीत, हे फार धाडसाचे काम आहे. लोकांचा उदंड प्रतिसाद मिळत असताना एखादी कलाकृती पूर्ण करणं, तिला पूर्णविराम देणं हे जास्त धाडसाचं काम आहे”, असं संकर्षण म्हणाला.

पुढे तो असंही म्हणाला की, “एरव्ही आपण शुभारंभाच्या प्रयोगाच्या शुभेच्छा देतो, तेही महत्त्वाचे आहे. एकवेळ शुभारंभाचा प्रयोग तुलनेने सोपा, पण उदंड प्रतिसादाच्या महासागरात एखादा प्रयोग पूर्ण करणं आणि तो पुन्हा न करणं हे जास्त अवघड आहे. या चिकाटीबद्दल या धाडसाबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून नमस्कार, तुमच्या टीमला सलाम. तुमच्यातील काही लोकांना मी जवळून ओळखतो. यात राजेश कांबळे, घाटे सर, पोंक्षे सर तर अर्थात आहेतच. तुम्हा सर्वांचे मनापासून अभिनंदन. ही कलाकृती आता जरी पूर्ण होत असली तरी वेगवेगळ्या कलाकृतीच्या माध्यमांतून आम्हाला भेटत राहा. या संपूर्ण टीमला माझा मनापासून नमस्कार आणि अनंत शुभेच्छा पुढच्या प्रवासासाठी….”

संकर्षणच्या या विडियोवर,” संकर्षण किती सुंदर प्रतिक्रिया दिलीस मित्रा, धन्यवाद.” अशी प्रतिक्रिया देत शरद पोंक्षेंनी(Sharad Ponkshe) देखील हा विडियो त्यांच्या इंस्टाग्रामवर शेअर केला आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

केतकी चितळे पुन्हा होतेय ट्रोल,मराठा जातीवरुन केले वक्तव्य; पाहा काय म्हणाली अभिनेत्री
अभिषेकवर मात करत मुनावर फारूकी बनला बिगबाॅस 17चा विजेता; पाहा काय मिळालं प्राइज  

हे देखील वाचा