Wednesday, February 21, 2024

अभिषेकवर मात करत मुनावर फारूकी बनला बिगबाॅस 17चा विजेता; पाहा काय मिळालं प्राइज  

सलमान खानचा(Salman Khan) रियालिटी शो बिगबाॅसचा 17वा सिझन काल संपला. 17व्या सिझनचा ग्रँड फिनाले काल पार पडला, आणि बिगबाॅस 17ला त्यांचा विजेता मिळाला. हा विजेता आहे मुनावर फारुकी. मुनावरने अभिषेकला मागे टाकुन बिगबाॅस 17ची ट्राॅफी स्वतःच्या नावावर केली. मुनावरला ट्राॅफीव्यतिरिक्तही प्राइझ मनी आणि काही मिळाली आहेत. विजेता कोण असेल यानंतर सर्वांना अत्सुकता होती ती या सिझनचा प्राइज मनी किती असणार आहे याची. काल मुनावरला ट्राॅफी व्यतिरिक्त 50 लाखांचा चेक आणि एक कार मिळाली आहे. यावेळी बिगबाॅस 17चा विजेता म्हणुन मुनावरच्या नावाची घोषणा सलमान खानने केली. चला यानिमित्ताने जाणुन घेऊया मुनावरबद्दल काही मनोरंजक गोष्टी.

मुळ इंदोरमध्ये राहणारा स्टँडअप काॅमेडीयन मुनावर फारूकीला आता संपुर्ण देश ओळखतोय. कंगनाने होस्ट केलेल्या काँट्रावर्शिअल रियालिटी शो ‘लाॅकअप’चा विजेता म्हणुन प्रसिद्धीस आलेला मुनावर सध्याला कोणत्या ना कोणत्या वादामुळे नेहमीच चर्चेत असतो. मुनावरने स्टँडअप काॅमेडी व्यतिरिक्त त्याच्या करियरला एक नवी दिशा दिली आहे.

मुनावर(Munawar Faruqui) आता जरी करोडोंचा मालक असला तरी एक वेळ अशी होती जेव्हा त्याच्या कुटुंबाला दोन वेळचं जेवण मिळणंही कठीण होऊन बसलं होतं. 2007मध्ये मुनावर मुंबईला येण्याआधी त्याच्या कुटुंबाला खुप मोठ्या आर्थिक अडचणीला सामोरं जावं लागलं. त्यावेळी काॅमेडियन असलेल्या मुनावरला त्याचे कुटुंब चालवण्यासाठी समोसेदेखील विकावे लागले होते. कौटुंबिक परिस्थितीमुळे त्याने मुंबईमध्ये भांड्याच्या दुकानातही काम केलं. त्याला या कामाचा मोबदला दिवसाला फक्त60 रुपये इतकाच मिळत होता.

याव्यतिरिक्त त्याने ग्राफिक डिजायनरचंही काम केलं आहे. 2007 यावर्षी जेव्हा ओटीटी प्लॅटफाॅर्म समोर आले तेव्हा त्याला स्टँडअप काॅमेडीबद्दल(Standup Comedy) समजलं. त्यानंतरंच मुनावरने स्टँडअप काॅमेडीवर काम करण्यास सुरुवात केली. त्याच्या पहिल्या शोचं नाव ‘दोध दह्यो ‘ असं होतं. त्यानंतर मुनावरने कधीही मागं वळुन पाहिलं नाही. तर स्वतःला गरीबीतुन बाहेर काढण्यासाठी दिवस-रात्र मेहनत केली आणि त्याने तसं करुनही दोखवलं. आज त्याच्याकडे करोडो रुपये आणि अनेक सुखवस्तुसुद्धा आहेत.

कंगना रणौतच्या( kangna ranaut) लाॅकअप शोचा विजेता आता बिगबाॅस 17 च्या स्पर्धेतही पहिल्या क्रमांकावर दिसत आहे. बादशाहपासुन करण कुंद्रापर्यंत अनेक सेलिब्रिटींनी समोर येऊन त्याला सपोर्ट केला होता. त्यांच्या सपोर्टला काल मुनावरने खरं करुन दाखवलं आहे. कारण मुनावर आता बिगबाॅस 17चाही विजेता(Bigboss 17 winner) ठरला आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

Ankita Lokhande | निराश मनाने बिग बॉसच्या सेटबाहेर पडली अंकिता लोखंडे, मुलाखत देण्यास देखील दिला स्पष्ट नकार
अभिषेकवर मात करत मुनावर फारूकी बनला बिगबाॅस 17चा विजेता; पाहा काय मिळालं प्राइज  

हे देखील वाचा