Tuesday, June 18, 2024

“शिवराय स्वराज्यासाठी लढवय्या आणि खरा स्वराज्यकरणी…” संतोष जुवेकरने ट्रोल करणाऱ्याला दिले सणसणीत उत्तर

मागील बऱ्याच काळापासून हिंदी, मराठीसोबत इतरही अनेक सिनेसृष्टीमध्ये ऐतिहासिक चित्रपटांची चलती आहे. इतिहासावर आधारित अनेक उत्तम सिनेमे मराठीमध्ये आतापर्यंत तयार झाले आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांवर तर आतापर्यंत अगणित सिनेमे आले. या सर्व सिनेमांमधून महाराजांच्या कार्याला एक सलाम करण्यात आला. महाराजांचे अतुलनीय कार्य आजच्या आणि येणाऱ्या पिढीला समजावे हाच एकमेव उद्देश या सर्व चित्रपटांच्या मागे होता. नुकताच असाच एक इतिहासावर आधारित सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला तो म्हणजे रावरंभा. या सिनेमाची सध्या जोरदार चर्चा आहे. ‘रावरंभा’ ही सह्याद्रीच्या कड्याकपाऱ्यांतील एक अनोळखी आणि अनोखी प्रेमकहाणी आहे.

याच सिनेमाचा एक भाग असणाऱ्या अभिनेता संतोष जुवेकरने रावरंभा हा सिनेमा पाहावा असे आवाहन करणारी एक पोस्ट शेअर केली. सोबतच अभिनेता कुशल बद्रिकेची देखील पोस्ट त्याने शेअर केली. पण आता त्यामुळे संतोष जुवेकरला ट्रोल केले जात आहे. कुशल बद्रिकेने एक पोस्ट शेअर करत त्यात लिहिले होते की, “स्पायडरमॅन कळायला हवा, पण घोरपडीच्या सहाय्याने गड चढणारा “तानाजी मालुसरे” आधी कळायला हवा”. त्याची ही पोस्ट कमालीची व्हायरल झाली. त्यावर अनेक नेटकऱ्यांनी भरभरून कमेंट्स देखील केल्या.

कुशलची हीच पोस्ट संतोष जुवेकरने देखील शेअर केली. त्याच्या या पोस्टवर कमेंट करताना एका नेटकऱ्याने लिहिले, “तुमचे पिच्चरं आली कि शिवराय आठवत्यात तुम्हाला , पैसे कमावता फक्त, महाराज त्यांचे मावळे तुम्हाला तरी कळलेत का अजून . ते स्पायडरमॅन, हल्क, आर्यन मॅन, मुलांना का कळायला हवीत. वाक्य तयार करण्यासाठी काहीही बाकळत जावू नका….”.

ही कमेंट वाचल्यानंतर संतोष जुवेकरने देखील त्याला योग्य उत्तर दिले. त्याने कमेंटमध्ये लिहिले, “मित्रा शिवराय अजून कुणालाच कळले नाहीत आणि कळणारही नाहीत कारण माझा राजा स्वराज्या साठी लढवह्या आहे आणि खरा स्वराज्यकरणी (राजकारणी नव्हे)आहे. पुन्हां असा न होणे राजा, पुन्हां असा न होणे लढवय्या, पुन्हां अशी न होणे काळजाला कळ स्वराज्या परी शिवराया सारखी. पुन्हां अशी न होणे माता शिवरायाची जिजाऊ सारखी. त्यानं दिलंय की ओंजळीत आपल्या. मग घेऊया आणि भाळी माळूया हा भंडारा. जय शिवराय जय जिजाऊ जय भवानी”.

संतोष इथेच थांबला नाही त्याने या कमेंट्चा आणि त्याच्या उत्तराचा एक स्क्रिनशॉट फेसबुकवर पोस्ट करत माफी देखील मागितली. संतोषने लिहिले, “मला माझ्या एका मित्राने खूप खडसावलं, त्याच बरोबरही असेल पण काहीस उगाच निरर्थक वाटलं म्हणुन हे माझं उत्तर त्याला दिलंय. माझं काही चुकलं असेल तर माफ करा. इतिहास आपण वाचलाय आणि ऎकलाय पण आपल्यापैकी पहिला कुणीची नाही. फक्त मनात आणि डोक्यात आणि विचारात आणि शरीरात आणि आणि आणि जे काय असल तिकडं आणि तिथे फक्त माझा शिवराय”.

आता संतोषच्या या पोस्टवर भरपूर कमेंट्स येत असून, त्याला सर्वानीच समर्थन दिले आहे. सध्या संतोषची ही पोस्ट, त्याची कमेंट आणि कुशलची पोस्ट कमालीची व्हायरल होत आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही नक्की वाचा-
‘प्रत्येक दिवस मधुचंद्रासारखा आहे’, वैवाहिक जीवनाबद्दल काय बोलली दलजीत कौर? एकदा वाचाच

सुंबुलवर काेसळला दु:खाचा डाेंगर; अभिनेत्री हंबरडा फाेडत म्हणाली, ‘तू नेहमी माझ्या हृदयात राहशील’

हे देखील वाचा