Monday, July 1, 2024

जिगरी यारी! अंकुश चौधरी अन् संतोष जुवेकर निघाले भटकंतीला, सोशल मीडियावर शेअर केला व्हिडिओ

मराठी चित्रपटसृष्टीत असे अनेक कलाकार आहेत, जे एकमेकांचे खूप चांगले मित्र आहेत. त्यातलीच एक जोडी आहे संतोष जुवेकर आणि अंकुश जाधव यांची. हे दोघेही मराठी चित्रपटसृष्टीतील अत्यंत हँडसम आणि प्रतिभावंत अभिनेते आहेत. त्या दोघांनीही अनेक चित्रपटात काम केले आहे. संतोषने अनेक मालिकांमध्ये देखील काम केले आहे. त्या दोघांची तगडी फॅन फॉलोविंग आहे. अशातच या दोन जिगरी मित्रांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये ते दोघेही कुठेतरी भटकंती करायला गेलेले दिसत आहे.

संतोष जुवेकरने त्याच्या अधिकृत फेसबुक पेजवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, ते दोघे कुठेतरी शांत निवांत ठिकाणी दिसत आहेत. यामध्ये अंकुश चौधरी व्हिडिओ काढत आहे. तर संतोष चालताना दिसत आहे. तसेच त्यांनी तेथील आजूबाजूचा परिसर देखील दाखवला आहे. शेवटी या व्हिडिओमध्ये अंकुश चौधरी देखील दिसतो. संतोषने हा व्हिडिओ शेअर करून लिहिले आहे की, “एक शांत भटकंती माझ्या एका शांत आणि सद्गुणी मित्रासोबत. साथ चांगली असेल तर प्रवास देखील चांगला वाटतो.”

https://www.facebook.com/591320049/posts/10159585290140050/?sfnsn=wiwspwa

त्याच्या या व्हिडिओवर अनेक चाहते कमेंट करत आहेत. तसेच अनेकजण त्याला हे ठिकाण कोणते ते विचारत आहेत. शिवाय सगळेजण त्यांच्या जोडीला प्रेम दर्शवत आहेत. (santosh juvekar share a video with ankush choudhary on social media)

अंकुश आणि संतोष यांनी अनेक चित्रपटात काम केले आहे. त्यांच्या कामाबाबत बोलायचे झाल्यास, अंकुश चौधरीने ‘दगडीचाळ’, ‘दुनियादारी’. ‘क्लासमेट’, ‘गुरु’, ‘ट्रिपल सीट’, ‘देवा’, ‘धुराळा’, ‘ती सध्या काय करते’ यासारख्या अनेक चित्रपटात काम केले आहे. तर संतोष जुवेकरने ‘एक तारा’, ‘मोरया’, ‘झेंडा’, ‘अधम’, ‘रेगे’, ‘शर्यत’, यासारख्या चित्रपटात काम केले आहे. तर त्याने ‘अस्सं सासर सुरेख बाई’ या मालिकेत मृणाल दुसानिस सोबत काम केले आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
पवन सिंगच्या ‘कमरिया पतरे पतरे’ गाण्याने केले रेकॉर्ड, यूटुबवर मिळवले तब्बल ‘इतके’ कोटी व्ह्यूज

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम प्रभाकर मोरे यांनी हाती बांधले घड्याळ, केला राजकीय कारकिर्दीचा प्रारंभ

हे देखील वाचा