Saturday, April 20, 2024

इंडिका गाडीतून भरत जाधव गेला होता ‘सही रे सही’च्या पहिल्या शोला, मनोरंजक होता ‘त्या’ शोचा किस्सा

मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज लेखक, दिग्दर्शक आणि निर्माते म्हणजे केदार शिंदे. केदार शिंदे यांनी अनेक नाटक- चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन केले आहे. काही वर्षांपूर्वी त्यांचे ‘सही रे सही’ हे नाटक प्रदर्शित झाले होते. ज्या नाटकाला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद देखील दिला होता. हे नाटक 15 ऑगस्ट, 2002 रोजी आले होते. या नाटकाला आज 19 वर्षे पूर्ण झाली आहेत. या निमित्त केदार शिंदे यांनी (15 ऑगस्ट) सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून या नाटकाच्या आठवणींना उजाळा दिला आहे. तसेच हा प्रवास अखंड चालू राहील अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

केदार शिंदे यांनी यांनी त्यांच्या अधिकृत फेसबुक अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर केली आहे. यासोबत त्यांनी अभिनेता भरत जाधवशी संबंधित एक किस्सा देखील शेअर केला आहे. त्यांनी लिहिले की, “19 वर्ष आज पूर्ण होतायत. 15.08.2002 रोजी हा ‘सही’ रथ ज्या भरधावाने निघाला तो अजूनही त्याच वेगात आहे. मला अजूनही आठवतो तो दिवस. माझ्या टाटा इंडिका गाडीतून मी आणि भरत, शिवाजी मंदिरच्या दिशेने निघालो. तेव्हा एकच गोष्ट मी भरतला वारंवार सांगत होतो. भरत आज दिवस तुझा आहे. जे जे आजपर्यंत करावसं वाटत होतं, ते साकार करण्याचा आजचा दिवस आहे. मी पडदा उघडल्यावर पडद्यामागे असणार. रंगमंच तुझा असणार आहे. त्यामुळे बागड त्या रंगमंचावर! आपल्या आण्णांनीच तो रंगमंच बांधलाय असं समज! आणि भरत जाधव याने परत परत परत परत तेच केलं. तब्बल १९ वर्ष.” (director kedar shinde share a memoris of first show of sahi re sahi drama )

त्यांनी पुढे लिहिले की, “या संपूर्ण प्रवासात त्याच्यासोबत त्याच तडफेने काम करणारे कलाकार आणि पडद्यामागचे तंत्रज्ञ… त्यांचं प्रेम अजूनही या जादूई नाटकावर तेवढंच आहे आणि तेवढंच राहील. मी मुलीच्या बापाच्या भूमिकेत होतो आणि राहीन! आपण लाडाने प्रेमाने मुलीला वाढवायचं आणि योग्य वेळी तिचं लग्न लावल्यावर तिचा सुखाचा संसार पाहायचा! या दरम्यान मुलीला काही अडचण, त्रास झाला, तर वेळोवेळी तत्परतेने पाठीशी उभंही राहायचं. माझ्या या मुलीचं लग्न भरत जाधव या कर्तव्यतत्पर मुलाशी लावलं. या दरम्यान ‘सासवा’ बदलल्या. मुलीला आणि भरतलाही त्याचा त्रास झाला. पण नेटाने त्याने संसार केला, आणि आता तर त्याने स्वत:चा संसार थाटलाय. खूप समाधान वाटतं! हे नाटक कधी बंद होऊ नये. पण जेव्हा हे थांबेल त्याला कारणीभूत भरतच असेल. तो जोवर तडफेने काम करतोय तोवर हे नाटक सुरू राहील. त्याला कंटाळा येईल तेव्हा हे थांबेल! पण मला वाटत नाही की, अजून 19 वर्षाने ही वेळ येईल!

https://www.facebook.com/100000962470497/posts/5946615258713831/?d=n

कोरोनाच्या पार्श्वभुमीवर नाटक थांबलंय. त्यामुळे खूप नुकसान कलाकार, तंत्रज्ञांचं होतंय! पण त्याहीपेक्षा अधिक नुकसान रसिक प्रेक्षकांचं होतंय. त्यांचं दिलखुलासपणे हसणं थांबलयं. पण काळजी नको. कोरोनापें रोने के बाद, त्यावर जालिम इलाज फक्त एकच असणार आहे. ‘सही’ श्री स्वामी समर्थांच्या कृपेने अशी कलाकृती माझ्या हातून घडली. पण यात माझ्या पाठीमागे असणारे स्वामी होतेच, पण त्यासोबत अजून एक व्यक्ती होती, माझा मित्र अंकुश चौधरी. मी, भरत, अंकुश या तिघांच्या मैत्रीचं प्रतिबिंब म्हणजे. ‘सही’ #लवकरचभेटू.”

केदार शिंदेने अनेक चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. त्याने ‘अगंबाई अरेच्चा 2’, ‘श्रीमंत दामोदर पंत’, ‘खो खो’, ‘ऑन ड्युटी 24 तास’, ‘इरादा पक्का’, ‘यांचा काही नेम नाही’, ‘माझा नवरा माझी बायको’, ‘यंदा कर्तव्य आहे’ या चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
सिद्धांतच्या मृत्यूने विवेक अग्निहोत्रीला बसला धक्का, ट्विट करत म्हणाले…

अर्चना गौतमला डिवचण्यासाठी शिव ठाकरेनं खेळला मोठा खेळ?

हे देखील वाचा