स्पेशल स्पेशल…! सपना चौधरीचे नवरीप्रमाणे श्रृंगार करून हटके फोटोशूट; पाहून चाहतेही घायाळ

Sapana chaudhari share her stunning photo shoot on social media


हरियाणवी ‘डान्सिंग क्वीन’ सपना चौधरी ही तिच्या गाण्यामुळे सर्वत्र प्रसिद्ध आहे. लोकप्रिय डान्सर आणि अभिनेत्री सपना ही तिच्या हटके अंदाजामुळे ओळखली जाते. ती अनेक ब्रॉड डिसायनर साठी मॉडेलिंग देखील करते. सपना सोशल मीडियावर देखील मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. तिचे फोटो आणि वेगवेगळे व्हिडिओ शेअर करून चाहत्यांना तिच्याकडे आकर्षित करत असते. नुकतेच तिने नवरीप्रमाणे शृंगार करून हटके फोटोशूट केले आहे. तिचे हे फोटोशूट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

सपनाने खूप सुंदर फोटोशूटचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. यामध्ये तिने पीच कलरचा लेहंगा घातला आहे. या लेहंग्याला सिल्वर कलरची अंब्रोडरी आहे. या सोबतच तिने हिरव्या रंगाची टिकली लावली आहे.
तसेच तिने हातात मॅचिंग बांगड्या आणि ज्वेलरी घातली आहे. तसेच भांगात सिंदूर भरला आहे. तिचा हा ड्रेस ललित डालमिया याने डिझाईन केला आहे.

हा व्हिडिओ शेअर करून तिने कॅप्शन दिले आहे की, “As far as a lehenga is concerned, Robert venturi was right : more is more and less is a bore!” तिचा हा लूक तिच्या चाहत्यांना खूपच आवडला आहे. तिचे चाहते या व्हिडिओवर कमेंटचा वर्षाव करत आहेत. एका युजरने लिहिले आहे की, “सुंदर.” दुसऱ्या एका युजरने लिहिले आहे की, “मॅम तुम्ही खूप सुंदर आहात.”

याआधी सपना चौधरीने एक फोटो शेअर केला होता. या फोटोमध्ये पिवळ्या रंगाचा ड्रेस घालून एका घोड्याला किस करताना दिसत होती. या फोटोवर देखील तिच्या चाहत्यांनी कमेंट केल्या होत्या.

कोरोना महामारीत देखील सपना चौधरीने समाजाप्रती तिचे दायित्व दाखवले होते. या बाबत तिने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला होता. जो मोठ्या संख्येने व्हायरल होत होता.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…


Leave A Reply

Your email address will not be published.