हरियाणवी डान्सर सपना चौधरी (Sapna Chaudhary) हिच्या स्टाईल आणि डान्सचे लाखो चाहते आहेत. चाहते तिच्या गाण्यांवर जोरदार डान्स करतात. सपनाच्या प्रत्येक अदांवर तिचे चाहते नेहमीच जीव ओवाळून टाकण्यासाठी तयार असतात. अनेक अडचणींना तोंड दिल्यानंतर तिने हे स्थान मिळवले आहे. आज ती तिच्या चाहत्यांमध्ये ‘हरियाणवी डान्स क्वीन’ म्हणून प्रसिद्ध आहे. जर तिचे कोणतेही नवीन गाणे आले, तर चाहते गाणे ऐकण्यासाठी आणि तिच्या डान्सच्या मूव्ह्ज पाहण्यासाठी उत्सुक होतात. सपना सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती जेव्हाही सोशल मीडियावर एखादी पोस्ट शेअर करते तेव्हा ती व्हायरल होते. सपना इंस्टाग्रामवर खूप सक्रिय आहे आणि चाहत्यांसाठी वेगवेगळे रिल्स आणि फोटो शेअर करत असते. नुकताच सपनाने तिचे लेहेंग्यातील काही फोटो शेअर केले. यामध्ये ती खूपच सुंदर दिसत असून, सपनाचा हा लूक चाहत्यांना खूप आवडला आहे.
हे फोटो शेअर करताना सपनाने लिहिले की, “माझ्यामुळे जग उजळले आहे.” सपनाच्या या पोस्टवर ६० हजारांपेक्षा अधिक लाईक्स आले असून, १००० हून अधिक युजर्सने कमेंट केल्या आहेत. सपनाचे चाहते फक्त हरियाणातच नाही, तर देशभरात आहेत. तिच्या या फोटोवर एका चाहत्याने लिहिले की, “तुझ्यापेक्षा सुंदर कोणी नाही…. मी तुझा खूप मोठा फॅन आहे.” दुसऱ्या एका चाहत्याने लिहिले, “तुम्ही असेच पोस्ट करत राहा, छान आहे.” एका चाहत्याने लिहिले की, “हे फोटो शेअर करून तुम्ही आग लावली.”
याआधी सपना बोटीवर मस्ती करताना दिसली होती. सपनाने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये ती बोटीवर बसून आपले केस हलवत होती. काही दिवसांपूर्वी सपनाचा म्युझिक व्हिडिओ ‘अलट पलट’ प्रदर्शित झाला होता. हे गाणे प्रदर्शित होताच सुपरहिट झाले.
यामध्ये सपनासोबत विवेक राघवही दिसला होता. सपना चौधरीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर तिचे ‘लोरी’ हे गाणे या वर्षातील सर्वात हिट गाणे होते. या गाण्याला १०० मिलियनपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. याशिवाय सपनाची ‘गुर्शल’, ‘घूम घाघरा’, ‘फटफटिया’, ‘बगडो’ आणि ‘बांगरो’ ही हरियाणवी गाणी प्रदर्शित झाली आहेत.
हेही वाचा-
रस्त्यावर लोकांना थांबवून थांबवून फुलं देताना दिसला कार्तिक आर्यन, पण काय आहे कारण?
BIGG BOSS 15: राखी सावंतच्या पतीने केला मोठा खुलासा, स्वतः च्या भूतकाळाबद्दल सांगितले ‘असे’ काही