Monday, July 1, 2024

देसी अंदाजमध्ये हरयाणवी क्वीन सपना चौधरीने केले लोकांना घायाळ, व्हिडिओ झाला व्हायरल

हरयाणवी डान्सर आणि अभिनेत्री सपना चौधरी नेहमीच लोकांची वाहवा मिळवत असते. आपल्या डान्सने आपल्या अदांनी तिने लोकांच्या मनात स्थान निर्माण केले आहे. आज सपना चौधरी एक मोठी सेलिब्रिटी म्हणून ओळखली जाते. सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असणारी सपना सतत त्यावर तिचे फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करत असते. तिच्या पोस्टवर तिचे फॅन्स भरभरून प्रेम दाखवत असतात. सपनाला ग्लॅमरस आणि मादक दिसण्यासाठी छोट्या कपड्यांची गरज नाही ती देसी वेशभूषेत देखील मादक आणि सुंदर दिसते. नुकताच तिचा देसी अंदाज आणि लूकमधला एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

सपना चौधरीने तिचा एक डान्स व्हिडिओ इंस्टाग्रामवर पोस्ट केला असून, यात तिने आकाशी रंगाचा पंजाबी सूट घातला असून, यात ती डान्स करताना दिसत आहे. तिचा यात एकदम देसी लूक असून, केसांची वेणी आणि त्यावर परांदा देखील तिने लावला आहे. या व्हिडिओमध्ये तिचा अंदाज आणि तिचा लूक लोकांना घायाळ करताना दिसत आहे. यावर फॅन्सच्या एकापेक्षा एक कमेंट्स येत असून सर्वच तिची आणि तिच्या या देसी अंदाजची स्तुती करत आहेत. सपनाने याआधी देखील अनेकदा तिच्या अशा लूकमध्ये अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sapna Choudhary (@itssapnachoudhary)

याआधी सपना चौधरी वेस्टर्न लूकमध्ये देखील दिसली होती. यात तिने नारंगी रंगाचा सैल टीशर्ट आणि त्यावर काळ्या रंगाची जीन्स घातली होती. सोबतच त्यावर टोपी देखील तिने कॅरी केली होती. या लूकमध्ये देखील ती कमालीची आकर्षक दिसत होती. दरम्यान सपना सध्या तिच्या वैयक्तिक आणि कौटुंबिक कारणामुळे लाइमलाईट्मधे आली आहे. तिच्या वाहिनीने काही दिवसांपूर्वीच तिच्यावर हुंडयासाठी त्रास दिल्याचा आरोप केला आहे. लग्नानंतर तिला सासरच्यांनी गाडी दिली नसल्यामुळे त्रास दिल्याचे सांगितले. यात तिने सपना चौधरींचे देखील नाव घेतले आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
एकीकडे संपत्तीचे वाद सुरु असताना दुसरीकडे नवाजुद्दीन सिद्दीकीने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

ऑस्कर सोहळ्यामध्ये दीपिका पदुकोण दाखवणार तिचा जलवा, दिसणार ‘या’ भूमिकेत

हे देखील वाचा