Sunday, January 26, 2025
Home अन्य दिल्लीहून ‘इंडिया गेट’ आणण्यासाठी सपना चौधरी करतेय धडपड, गाण्याला मिळतायत तुफान व्ह्यूज

दिल्लीहून ‘इंडिया गेट’ आणण्यासाठी सपना चौधरी करतेय धडपड, गाण्याला मिळतायत तुफान व्ह्यूज

सपना चौधरी तिच्या देसी स्टाईल आणि डान्समुळे सतत चर्चेत असते. सोशल मीडियावर तिच्या अनेक जुन्या गाण्यांसोबतच नवीन गाणीही चर्चेत असतात. सपना एकामागून एक नवीन हरियाणवी गाण्यांवर थिरकताना दिसते. ऋचिका जांगीडच्या अनेक गाण्यांना हिट बनवणारी सपना पुन्हा एकदा ऋचिकाच्या नवीन गाण्यात दिसली आहे. ज्यामध्ये तिचा डान्स पुन्हा चाहत्यांना घायाळ करत आहे. नुकतंच प्रदर्शित झालेल्या ‘अलट-पलट’ या गाण्यानंतर आता हरियाणवी क्वीनचे नवे गाणे ‘इंडिया गेट’ प्रदर्शित झाले आहे.

युट्यूबवर घालतंय धुमाकूळ
अलीकडेच सपनाचे ‘इंडिया गेट’ हे नवीन गाणे प्रदर्शित झाले आहे. हे गाणे प्रदर्शित होताच युट्यूबवर चांगलेच धुमाकूळ घालत आहे. या गाण्यात सपना आपल्या पतीला ‘इंडिया गेट’ला दिल्लीतून उखाड गावात घेऊन येण्याची विनंती करत आहे. जेणेकरून दिल्लीच्या जाळ्यात अडकून न राहता, गावातच राहूनच दिल्ली पाहू शकेल.

ऋचिका जांगीडने गाण्याला दिला सुरेल आवाज
हे गाणे जीएससी म्युझिक या युट्यूब चॅनेलवर प्रदर्शित करण्यात आले असून, ते आतापर्यंत सुमारे १० लाखाहून प्रेक्षकांनी पाहिले आहे. ऋचिका जांगीडने या गाण्याला तिचा आवाज दिला आहे. तर गाण्याचे बोल फरिश्ता यांनी लिहिले आहेत.

कसे आहे गाणे?
या गाण्याबद्दल सांगायचे झाले, तर गाण्याच्या सुरुवातीला सपना गावातील महिलांमध्ये बसून आपल्या पतीचे कौतुक करताना दिसते. त्यानंतर सर्व महिला म्हणतात की, जर तुझ्या नवऱ्याचे इतकेच चालते, तर तू दिल्लीला गावातच का नाही बोलावून घेत? यानंतर, सपना तिच्या पतीकडे पोहोचते आणि उखाड गावात इंडिया गेट बसवण्यास सांगते. यासोबतच दिल्लीच्या जाळ्यात अडकू नये आणि सर्व गोष्टींचा आनंद घेता यावा म्हणून बाजारासह अनेक गोष्टी गावात आणण्यास सांगते. पण या गाण्याच्या शेवटी तिने या सर्व गोष्टींचा उल्लेख तिच्या स्वप्नात केल्याचे समोर येते.

सपना चौधरी आली अडचणीत
लखनऊ न्यायालयाने सपना चौधरी विरोधात अटक वॉरंट जारी केले आहे. सपनावर शो रद्द केल्याचा आणि प्रेक्षकांचे पैसे परत न केल्याचा आरोप आहे. अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी शंतनू त्यागी यांनी हरियाणवी डान्सर आणि गायिका सपना चौधरी विरुद्ध अटक वॉरंट जारी केले असून, या प्रकरणाच्या पुढील सुनावणीपर्यंत पोलिसांना कारवाई करण्यास सांगितले आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी २२ नोव्हेंबरला होणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-KBC: शोदरम्यान स्पर्धकाने बिग बींना जया बच्चनबद्दल विचारला ‘असा’ प्रश्न, अभिनेत्याने शो सोडण्याची केली विनंती

-चार मुली जन्माला आल्यानंतर तुटले होते वडिलांचे मन, त्याच मुली आज बॉलिवूडवर गाजवतायत अधिराज्य

-‘सूर्यवंशी’मुळे पाकिस्तान त्रस्त! राष्ट्रपतींसह ‘या’ अभिनेत्रीने इस्लामोफोबियाबद्दल व्यक्त केली चिंता

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा