हरियाणवी ‘डान्सिंग क्वीन’ सपना चौधरी ही तिच्या गाण्यांमुळे सर्वत्र प्रसिद्ध आहे. लोकप्रिय गायिका, डान्सर ही तिच्या अंदाजामुळे ओळखली जाते. सपना सोशल मीडियावर देखील मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. तिचे फोटो आणि वेगवेगळे व्हिडिओ शेअर करून चाहत्यांना तिच्याकडे आकर्षित करत असते. तिचे चाहते आज संपूर्ण देशात पसरले आहेत. अनेकजण तिचा लूक कॉपी करत असतात. तिचे व्हिडिओ देखील सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असतात. पुन्हा एकदा तिने तिच्या अदा प्रेक्षकांना दाखवल्या आहेत. तिने तिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.
नुकतेच सपनाने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ती देशी लूकमध्ये खूपच सुंदर दिसत आहे. या व्हिडिओमध्ये ती काहीच बोलत नाही, कोणतेच गाणे गात नाही फक्त तिच्या डोळ्यांच्या इशाऱ्याने ती सर्वांना दीवाने बनवत आहे.
सपनाने शेअर केलेल्या या फोटोमध्ये ती पारंपरिक वेशात दिसत आहे. बिंदी, भांगेत सिंदुर आणि तिची अदा पाहून सगळेच तिच्या प्रेमात पडले आहेत. तिचा हा लूक तिच्या चाहत्यांना खूपच आवडला आहे. सगळेजण तिच्या लूकचे कौतुक करत आहेत.
या व्हिडिओमध्ये बॅकग्राउंडला एक गाणे वाजत आहे. या गाण्याच्या म्युझिकवर सपना तिच्या अदा दाखवत आहे. हा व्हिडिओ शेअर करून तिने प्रेक्षकांना प्रश्न विचारला आहे. हा व्हिडिओ शेअर करून तिने लिहिले आहे की, “तुम्ही ओळखू शकता का, हे कोणत्या गाण्याचे संगीत आहे?” यांनतर युजर्सनी खूप कमेंट करून या प्रश्नाचे उत्तर दिले आहे.
या व्हिडिओच्या बॅक ग्राउंडला जी धून वाजत आहे ती इमरान हाश्मीचे गाणे ‘कहो ना कहो ना.. ये आंखे बोलती है” हे आहे. सपनाच्या चाहत्यांनी या व्हिडिओवर कमेंट करून तिचे खूप कौतुक केले आहे. एका युजरने लिहिले आहे की, “तूच माझ्या जगण्याचा आधार आहेस.”
सपना चौधरीच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, ती सध्या एँड टीव्हीवरील क्राईम शो ‘मौका ए वारदात’ रवी किशन आणि मनोज तिवारीसोबत होस्ट करत आहे. तिने भोजपुरी, पंजाबी आणि बॉलिवूडमध्ये देखील काम केले आहे. तिने बॉलिवूडमध्ये ‘दोस्ती के साईड इफेक्ट्स’ या चित्रपटाततून पदार्पण केले होते.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-