हरियाणाची सुपर डान्सर म्हणून सपना चौधरीचे (Sapna Choudhary) नाव घेतले जाते. आपल्या खतरनाक डान्ससाठी सपना देशभरात प्रसिद्ध आहे. सपनाच्या डान्सचे तिच्या अदांचे देशभरात असंख्य चाहते पाहायल मिळतात. तिच्या डान्सचे व्हिडिओ सोशल मीडियावर नेहमीच व्हायरल होत असतात. सध्या सपना चौधरीचे ‘लव्ह यू गोरी रे’ हे गाणे जोरात सुरू आहे. हे गाणे सोशल मीडियावरही ट्रेंडमध्ये आहे. याशिवाय नुकताच सपना चौधरीनेही एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ती चालत्या कारमध्ये या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. विशेष म्हणजे सपना चौधरीला पाहताच सपनाच्या कारसमोर धावणाऱ्या ट्रकमधील महिलाही नाचू लागल्या.
सपना चौधरी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती अनेकदा तिचे डान्स व्हिडिओ आणि स्टायलिश फोटो सोशल मीडियावर शेअर करताना दिसते. पुन्हा एकदा सपना चौधरीने एक अप्रतिम व्हिडिओ शेअर केला आहे. सपना चौधरी कारच्या पुढच्या सीटवर बसून ‘लव्ह यू गोरी रे…’ हे गाणे वाजत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. कारमध्ये बसल्यावर सपना चौधरी या गाण्यावर नाचू लागते.
View this post on Instagram
सपना चौधरीच्या कारसमोरून एक मिनी ट्रक जात असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. त्यात अनेक महिलाही आहेत. सपना चौधरीला नाचताना पाहून महिलाही नाचू लागल्या. व्हिडिओ अतिशय मनोरंजक आहे. ट्रकमधील महिला डान्सच्या बाबतीत सपना चौधरीला पूर्ण स्पर्धा देत असल्याचे पाहायला मिळत आहे. महिलांचा डान्स पाहून सपना चौधरीलाही खूप आनंद होतो. हा व्हिडिओ शेअर करत तिने कॅप्शनमध्ये ‘आम्ही आनंदी आहोत, आनंदी आहोत आणि अभिमानाने आनंदी राहू! गाण्याला एवढं प्रेम दिल्याबद्दल धन्यवाद”,अशा शब्दात तिचा आनंद व्यक्त केला आहे. सपना चौधरीच्या या व्हिडिओला खूप पसंती मिळत आहे.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा – आलिया भट्टचं डोहाळे जेवण! समोर आली पाहुण्याची यादी, पाहा कोणाकोणाला दिले निमंत्र
‘डान्स आणि एक्शन सीन करु नकोस…’ ऋतिक रोशनला डॉक्टरांनी दिला सल्ला, अभिनेत्याचे उत्तर ऐकून कराल कौतुक
आर्यन खानच्या प्रेमात पडलेली पाकिस्तानी सुंदरी आहे तरी कोण? वाचा सजल अलीचा संघर्षमय प्रवास