Sunday, December 22, 2024
[aioseo_breadcrumbs]

अभिनेत्री सारा अली खानने पॅपराजींसोबत साजरा केला तिचा वाढदिवस, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खानने नुकताच तिचा वाढदिवस साजरा केला. सरळ फॅन्स, कलाकार सर्वांनीच वेगवेगळ्या माध्यमातून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी साराच्या घरी रात्री १२ वाजता तिच्या भावाने आणि काही जवळच्या मित्रमैत्रिणींनी तिच्यासाठी एका मस्त पार्टीचे आयोजन देखील केली होते. साराच्या या बर्थडे सेलिब्रेशनचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल देखील झाले होते. गुलाबी रंगाच्या फुग्यांनी ‘सारा’ असे नाव तयार केले गेले आणि केक कट करत तिने तिचा वाढदिवस साजरा केला.

साराचा वाढदिवस कुटुंबाने तर साजरा केलाच केला मात्र अनेक पॅपराजींनी देखील साराला स्पॉट करत तिचा वाढदिवस साजरा केला या सेलिब्रेशनचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. विरल भियाना या इंस्टाग्राम अकाऊंटवरून हा वाढदिवसाचा व्हिडिओ पोस्ट केला गेला आहे. या व्हिडिओमध्ये सारा केक कापताना दिसत असून, सर्व पॅपराजी तिच्यासाठी गाणे गात असल्याचे ऐकायला येत आहे. केक कापून झाल्यावर सारा फोटोग्राफर्सजवळ येत त्यांना केक देत ‘तुम्ही सर्वानी खा’ असे सांगत आहे. साराला पॅपराजी केक खाण्याचा आग्रह करतात, तेव्हा ती, ‘मी डायटवर आहे’ असे सांगताना दिसली. यावेळी साराने ब्लु जीन्स, व्हाइट टॉप, ब्लॅक मास्क आणि एक छोटी सिलिंग बॅग कॅरी करताना दिसली. (sara ali khan birthday celebration with photographers)

 

मीडियामध्ये साराची इमेज खूपच चांगली असून तिला एक संस्कारी मुलगी म्हणून देखील ओळखली जाते. साराचे अनेकदा रस्त्यावर शॉपिंग करतानाचे, गरीब लोकांना खाऊ घालत असल्याचे, स्वतःचा सामान स्वतः सांभाळायचे व्हिडिओ, फोटो व्हायरल होतात. सैफ अली खान आणि अभिनेत्री अमृता सिंग यांची मुलगी असलेल्या साराने चित्रपटांमध्ये येण्यासाठी स्वतःवर अतिशय मेहनत घेतली आहे. सारा या क्षेत्रात येण्याआधी तब्बल ९६ किलोची होती. पीसीओडी आजारामुळे तिचे वजन प्रचंड प्रमाणात वाढल्याची माहिती तिने अनेक मुलाखतींमध्ये दिली आहे. मात्र सिनेमांसाठी साराने तिचे वजन कमी केले आणि फॅट तो फिट होऊन ‘केदारनाथ’ सिनेमातून चित्रपटांमध्ये प्रवेश केला.

आज साराची गिनती सिनेसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये होते. आगामी काळात सारा अक्षय कुमार आणि धनुषसोबत ‘अतरंगी रे’ सिनेमात झळकणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-या वीकेंडलाही ‘सुपर डान्सर’मध्ये शिल्पा शेट्टी गैरहजर; पण जॅकी अन् संगीताची जोडी लावणार ‘चार चाँद’

-आर माधवनसोबत विमानात पहिल्यांदाच घडले ‘असे’ काही; अभिनेत्याचा व्हिडिओ पाहून तुम्हालाही वाटेल आश्चर्य

-युरोप फिरून ५ महिन्यानंतर मायदेशी परतली परिणीती चोप्रा; म्हणाली, ‘आपल्या घरासारखे…’

हे देखील वाचा