Monday, July 1, 2024

सारा अली खानच्या लेट नाईट बर्थडे पार्टीचे फोटो व्हायरल; अभिनेत्रीने २६ व्या वर्षात केले पदार्पण

आजच्या घडीला बॉलिवूडमध्ये नव्या पिढीने धमाकेदार प्रवेश केला आहे. ही आजची पिढी त्यांच्या अभिनयाने मोठा पडदा नुसता गाजवत नाही, तर धमाका करत आहे. आजच्या नव्या पिढीतील कलाकारांकडे पाहिले, तर त्यात प्रकर्षाने एक नाव घ्यावे लागेल आणि ते म्हणजे सारा अली खान. साराने तिच्या अभिनयाच्या जोरावर बॉलिवूडमध्ये स्वतःचे अस्तित्व निर्माण केले आहे. आज साराकडे एक यशस्वी आणि हिट सिनेमाची शाश्वती म्हणून पाहिले जाते. सारा गुरुवारी (१२ ऑगस्ट) तिचा २६ वा वाढदिवस साजरा करत आहे.

साराच्या या खास दिवशी तिला सगळीकडूनच भरभरून शुभेच्छा मिळत आहेत. साराच्या मित्रांनी आणि कुटुंबाने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यातच रात्री लेट नाईट साराच्या बर्थडेचे सेलिब्रेशन देखील करण्यात आले. याच सेलिब्रेशनचे काही फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. साराने तिचा भाऊ इब्राहिम अली खान आणि काही मित्रांसोबत वाढदिवस साजरा केला. (sara ali khan celebrated her birthday with brother and friends)

या व्हायरल झालेल्या फोटो आणि व्हिडिओमध्ये साराचे नाव गुलाबी रंगाच्या फुग्यांनी बनवण्यात आलेले दिसत आहे. सोबतच हॅप्पी बर्थडे सारा देखील लिहिलेले दिसत आहे. सारा तिचा भाऊ आणि मित्रांसोबत मजा मस्ती करताना दिसत असून हे फोटो तिच्या मित्रांनी देखील शेअर केले आहे. साराचे तिच्या भावासोबत इब्राहिमसोबत खूपच चांगले नाते आहे. या फोटोंमधून देखील त्यांचे बॉण्डिंग दिसून येत आहे.

आजच्या दिवशी साराला तिच्या फॅन्ससोबतच बॉलिवूडमधील जान्हवी कपूर, मनीष मल्होत्रा, आत्या सबा अली खान, अनुष्का शर्मा, आनंद एल राय, राधिका मदान, करीना कपूर खान, सोहा अली खान सोबतच अनेक लोकांनी तिला वाढदिवसाच्या दिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. सैफ अली खानच्या बहिणीने सबा खानने साराच्या फोटोंचे एक कोलाज बनून सोशल मीडियावर पोस्ट केले आहे.

साराबद्दल सांगायचे झाले, तर चित्रपटांमध्ये येण्यापूर्वी सारा ९६ किलो वजनाची होती. तिला पीसीओडीचा त्रास आल्याने तिचे वजन खूप होते. मात्र, जेव्हा तिने चित्रपटांमध्ये येण्याचा निर्णय घेतला, तेव्हा तिने वजन कमी करणासाठी शर्थीचे प्रयत्न केले. प्रचंड मेहनतीने आणि एकाग्र मनाने तिने तिचे वजन कमी केले.

वजन कमी केल्यानंतर २०१८ साली साराने ‘केदारनाथ’ सिनेमातून सुशांत सिंग राजपूतसोबत सिनेसृष्टीमधे पदार्पण केले.

आगामी काळात सारा आनंद एल राय यांच्या ‘अतरंगी रे’ सिनेमात अक्षय कुमार आणि धनुषसोबत दिसणार आहे. शिवाय ती ‘द इम्मॉर्टल अश्वत्थामा’ आणि ‘नखरेवाली’ या चित्रपटांमधून देखील समोर येणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-या वीकेंडलाही ‘सुपर डान्सर’मध्ये शिल्पा शेट्टी गैरहजर; पण जॅकी अन् संगीताची जोडी लावणार ‘चार चाँद’

-आर माधवनसोबत विमानात पहिल्यांदाच घडले ‘असे’ काही; अभिनेत्याचा व्हिडिओ पाहून तुम्हालाही वाटेल आश्चर्य

-युरोप फिरून ५ महिन्यानंतर मायदेशी परतली परिणीती चोप्रा; म्हणाली, ‘आपल्या घरासारखे…’

हे देखील वाचा