Wednesday, June 26, 2024

सारा अली खानच्या लग्नाची रंगली चर्चा, अभिनेत्रींच्या आत्याने दिली हिंट

बॉलिवूडच्या दुनियेत सध्य सनई चौघडे ऐकायला मिळत आहेत. अभिनेत्री रकुल प्रीत सिंह आणि जॅकी भगनानी लवकरच लग्नबंधनात अडकणाअन् आता साराच्या लग्नाच्या चर्चेलाही उधाण सिनेसृष्टीत आहेत. तर दुसरीकडे सिनेसृष्टीत काही कलाकारांच्या लग्नाची चर्चा सुरु आहे. अशातच आपल्या अभिनयाच्या जोरावर सर्वांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री सारा अली खान (sara ali Khan) लग्नासंदर्भातील कमेंटमुळं चर्चेत आली आहे.

सारा सध्या तिचा ‘ए वतन मेरे वतन’ या आगामी चित्रपटाच्या शुटिंगमध्ये व्यस्त आहे. अशातच साराने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर काही फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये ती वधुच्या वेशात दिसत आहे. साराने गुलाबी लेहंगा, लाइट मेकअप आणि ज्वेलरी परिधान केली आहे. सारा या लुकमध्ये खुपच सुंदर दिसत आहे. तिच्या या पोस्टवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

अशातच तिचा हा लुक पाहून तिच्या लग्नाची चर्चा सुरु आहे. विशेष म्हणजे तिच्या या पोस्टला आत्या सबा अली खान यांनी केलेल्या कमेंटने सर्वांचे लक्ष वेधले आहे. साराच्या या पोस्टवर सबा अली खान यांनी ‘चल तुझही लग्न करु’ अशी कमेंट केली आहे. त्यांच्या या कमेंटनंतर साराच्या लग्नाच्या चर्चेला उधाण आलं. अनेक चाहते युजर्स तिला अनेक प्रश्न विचारत आहे. कधी करणार लग्न? तर दुसऱ्या एका युजरने, तुमच्या या पोस्टला आम्ही लग्नाची हिंट समजू का? असा सवाल युजर्स उपस्थित करत आहेत.

वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर सारा ‘ए वतन मेरे वतन’ चित्रपटाच्या शुटिंगमध्ये व्यस्त आहे. हा चित्रपट स्वातंत्र्यसेनानी उषा मेहता यांच्या आयुष्यावर आधारित आहे. उषा मेहता यांनी गुप्त रेडिओच्या माध्यातून भारतातील तरुणांना ब्रिटीश राजवटी विरुद्ध एकत्र येण्याचं आवाहन केलं होतं. यामुळे ब्रिटीशांविरोधातल्या स्वातंत्र्यलढ्याला एक नवी दिशा मिळाली. सारा अली खानचा हा नवा चित्रपट २१ मार्चला प्राइम व्हिडिओवर रिलीज होणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

अल्लू अर्जुनचा चाहत्यांना सुखद धक्का; पुष्पा 2 रिलीजपूर्वीच केली मोठी घोषणा
घटस्फोटानंतर ईशा देओलची राजकारणात एन्ट्री? आई हेमा मालिणी यांच्या वक्तव्याने खळबळ

हे देखील वाचा