Monday, June 24, 2024

सारा अली खानने ‘अंतरंगी रे’चे दिग्दर्शक असलेल्या आनंद एल रायसोबत फोटो शेअर करत म्हटले, ‘धन्यवाद’

सारा अली खान सध्या खूपच चर्चेत आहे. नुकताच तिच्या बहुप्रतीक्षित अशा ‘अतरंगी रे’ सिनेमाचं ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. या सिनेमात सारासोबतच अक्षय कुमार, धनुष दिसणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रसिद्ध आणि हुशार दिग्दर्शक असलेल्या आनंद एल. राय यांनी केले आहे. ओटीटी प्लॅटफॉर्मवर हा सिनेमा प्रदर्शित होणार असून, सर्वत्र या चित्रपटाची आणि या सिनेमाच्या ट्रेलरचीच चर्चा आहे. सर्वांनाच या सिनेमातील साराची भूमिका तुफान आवडत आहे. बिनधास्त सारा या सिनेमाच्या निमित्ताने फार भाव खाऊन जात आहे.

यातच साराने तिच्या इंस्टग्राम अकाऊंटवरून एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये सारा आनंद एल राय यांच्यासोबत दिसत आहे. यात तिने गुलाबी रंगाचा दुप्पटा घेतला असून, ब्राऊन रंगाचे स्वेटर घातले आहे. तर आनंद यांनी ब्लू रंगाचे जॅकेट आणि पिंक रंगाचा टि शर्ट घातला आहे. या फोटोमध्ये ती आनंद एल राय यांच्या खांद्यावर डोके ठेऊन हसताना दिसत आहे. साराने तिचा हा फोटो शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले, “हॅप्पी थॅक्सगिविंग, मी खरंच आनंद एल राय सरांची आभारी आहे. मला रिंकू देण्यासाठी धन्यवाद…मात्र पिक्चर अभी बाकी है.”

अंतरंगी सिनेमाचा ट्रेलर पहिला तर आपल्याला लक्षत येईल की, यात सारा खूप गोंधळली दिसत आहे. या सिनेमात ती रिंकू नावाची भूमिका साकारताना दिसणार असून, रिंकू एकदम बिनधास्त, मस्त आणि बोल्ड आहे. या ट्रेलरवरून सिनेमा किती मस्त, धमाल असणार आहे, याचाच अंदाज आपण लावू शकतो. ट्रेलरमध्ये दिसते की, धनुष आणि साराचे जबरदस्तीने लग्न लावले जाते. मात्र त्यांना सोबत राहायचे नसते. या दरम्यान त्यांचे नाते वेगळ्या वळणाने जाते, त्यातच अक्षय कुमारची एन्ट्री दाखवली आहे. आता नक्की सिनेमात काय पाहायला मिळणार हे चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतरच समजेल.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-अर्रर्रर्र! कॅटरिना कैफ आणि विकी कौशल करणार नाही लग्न? नातेवाईकाने केला मोठा खुलासा

-अश्लील चित्रपट प्रकरणात पुन्हा वाढल्या राज कुंद्राच्या अडचणी, न्यायालयाकडून फेटाळण्यात आला अटकपूर्व जामीन

-Bigg Boss 15; जय भानुशाली झाला शोमधून आऊट, तर नेहा भसीन आणि विशाल कोटियानही झाले बेघर

हे देखील वाचा