Monday, July 1, 2024

‘इतिहासातली न उलगडणारी पानं…’, म्हणत, करण जोहरने शेअर केला सारा अली खानच्या नवीन चित्रपटाचा टीझर

बॉलिवूडमधील पटौदी कुटुंबातील सैफ अली खान याची मुलगी अभिनेत्री सारा अली खान हिने आपल्या अभिनयाच्या जोरावर इंडस्ट्रीमध्ये वेगळीच ओळख निर्माण केली आहे. आता पुन्हा एकदा ती चाहत्यांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाली आहे. नुकतंच प्रसिद्ध दिग्दर्शक करण जोहर याने साराच्या आगामी येणाऱ्या चित्रपटाची घोषणा केली आहे.

अभिनेत्री सारा अली खान (Sara Ali Khan) ही लवकर ‘ऐ वतन मेरे’ हा नवीन चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याची एक झलक प्रसिद्ध दिग्दर्शक करण जोहर (Karan Johar) याने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरुन चित्रपटाचा एक शॉर्ट टिझर पोस्ट केला आहे. हा चित्रपट एक थ्रिलर ड्रामा असून तरुण फ्रीडम फायटर उषा मेहता (Uaha Meheta) यांच्या जीवनावर आधारित कथा असणार आहे.

करणने पोस्ट केलेल्या टीझरमध्ये  सारा हळूच एका अंधाराच्या खोलीतून बाहेर येते आणि रेडिओ सदृष यंत्र सुरु करुन बोलायला सुरुवात करते. तेव्हा अचानकच जोरजोरात घराचा दरवाजा वाजवला जातो. या चित्रपटामध्ये स्वातंत्र्यपूर्व काळातील ‘भारत छोडो’ आंदोलनाचे संदर्भ आपल्याला पाहायला मिळणार आहेत.

 

View this post on Instagram

 

‘ऐ वतन मेरे’ वतन’ या चित्रपटामध्ये इंग्रज काळातील काही सत्य घटनांवर आधारित आहे. या चित्रपटामध्ये 1942 च्या ‘भारत छोडो’ आंदोलनाची  पार्शवभुमी दाखवली असून या स्वातंत्र्य लढ्यामध्ये एक कॉलेजवयीन तरुणी भाग घेते हा प्रवास या चित्रपटातून उलगडणार आहे. त्यासोबतच तरूणांची हिंमत, देशभक्ती, बलिदान याचं चित्रण आपल्याला यात पाहायला मिळणार आहे.

ऐ वतन मेरे वतन’ या चित्रपटाचे कथा कथन दरब फारूकी (Darab Farooqui) यांनी केलं असून कन्नन अय्यर (Kannan Iyer) हे चित्रपटाचं दिग्दर्शन करणार आहेत. करणने हा व्हिडिओ शेअर करत कॅप्सनमध्ये लिहिले की, “भारताच्या स्वातंत्र्य लढ्यामधील इतिहासातली न उलगडणारी पानं उलगडी जानार आहेत.” साराला आजवर आपण अशा भूमिकांमध्ये पाहिलेच नसेल.या चित्रपटाची तारीख अजून नक्की केली नाही, परंतु हा चित्रपट अ‍ॅमेझॉन प्राइम या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
अखेर सलमान आणि शाहरुख खान येणार सोबत, 25 जानेवारीला मिळणार सिनेप्रेमींना डबल ट्रीट
‘जेव्हा घरातून लव्ह मॅरेजला परमिशन मिळते…’ रंग माझा वेगळा फेम रेश्मा शिंदेची ‘ती’ पोस्ट झाली व्हायरल

हे देखील वाचा