Monday, February 24, 2025
Home बॉलीवूड सचिन तेंडुलकरच्या लाडक्या लेकीने ‘या’ व्यक्तीचा धरला हात! साराचे ‘डेट नाईट’चे फोटो व्हायरल

सचिन तेंडुलकरच्या लाडक्या लेकीने ‘या’ व्यक्तीचा धरला हात! साराचे ‘डेट नाईट’चे फोटो व्हायरल

सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) याला क्रिकेट जगताचा देव म्हटले जाते. आजही सचिन देशभरातील करोडो चाहत्यांच्या हृदयावर राज्य करतो. सचिनसोबतच आता त्याची मुलगी सारा तेंडुलकर (Sara Tendulkar) देखील खूप चर्चेत आहे. सारा ही सोशल मीडिया प्रेमी आहे आणि तिचे फोटो व्हिडिओ शेअर करण्याची एकही संधी सोडत नाही. नुकतेच तिने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत. जे तुफान व्हायरल होत आहे. Sara Tendulkar on date night

नुकतेच साराने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर डेट नाईटचे फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये सारा एका खास व्यक्तीचा हात धरताना दिसत आहे. तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर फोटो शेअर करताना साराने लिहिले की, “स्पेशल डेट नाईट.”

Sara-Tendulkar
Photo Courtesy Instagramsaratendulkar

खरंतर, फोटोमध्ये साराने ज्या खास व्यक्तीचा हात पकडला आहे, ती दुसरी कोणी नसून बॉलिवूडची लोकप्रिय गायिका कनिका कपूर  (Kanika Kapoor) आहे. फोटोमध्ये फक्त कनिकाचा हात दिसत आहे. हे फोटो कनिकानेही तिच्या अकाऊंटवर शेअर केले आहेत. यावरून कनिका आणि सारा एकमेकींच्या खूप चांगल्या मैत्रिणी असल्याचे समजते. अनेकदा दोघीही एकत्र दिसतात. काही काळापूर्वी सारा आणि कनिका लंडनमध्ये एकत्र दिसल्या होत्या. (sara tendulkar photo sachin tendulkar daughter sara tendulkar date night photos breaking the internet)

साराने तिच्या पहिल्या प्रेमाचा खुलासा केल्यामुळे ती सोशल मीडियावर बरीच चर्चेत राहिली. तिने इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोमध्ये ती तिच्या आईसोबत दिसत होती. साराचा हा लहानपणीचा फोटो होता. फोटोमध्ये सारा तिच्या आईच्या मांडीवर बसलेली दिसत होती. तो फोटो शेअर करताना साराने लिहिले, “घर तिथे आहे जिथे ती आहे, माझ्या आईला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. ती माझी सर्वात चांगली मैत्रीण आहे आणि माझे तिच्यावर खूप प्रेम आहे.”

सारा शुभमनच्या बहिणीला करते फॉलो
शुभमन गिल आणि सारा एकमेकांना इंस्टाग्रामवर फॉलो करतात. एवढेच नाही तर दोघेही एकमेकांच्या कुटुंबाला फॉलो करतात. शुभमन साराच्या कुटुंबातील सर्व सदस्यांना फॉलो करतो. साराही शुभमनची बहीण सेहनील गिलला इंस्टाग्रामवर फॉलो करते.

अलिकडेच सारा तेंडुलकर आणि शुभमन यांच्या डेटींगची बऱ्याच चर्चा रंगल्या होत्या. शुभमनने काही दिवसांपूर्वी दावा केला होता की, तो सिंगल आहे. त्याने इंस्टाग्रामवर चाहत्यांसोबत प्रश्नोत्तरे सेशनमध्ये सिंगल असण्याबद्दल खुलासा केला होता.

हेही नक्की वाचा –

हे देखील वाचा