Friday, April 25, 2025
Home मराठी अंगावर काटा आणणारा ‘सरसेनापती हंबीरराव’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित, प्रवीण तरडेेंच्या लूकने वेधले लक्ष

अंगावर काटा आणणारा ‘सरसेनापती हंबीरराव’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित, प्रवीण तरडेेंच्या लूकने वेधले लक्ष

सध्या मराठी चित्रपट क्षेत्रात अनेक ऐतिहासिक चित्रपट तयार होत आहेत. नुकताच प्रदर्शित झालेला ‘पावनखिंड’ चित्रपट सगळीकडे प्रचंड गाजला. या चित्रपटाने कमाईचे अनेक नवनवे विक्रम प्रस्थापित केले. ‘पावनखिंड’ चित्रपटाच्या यशाने पुन्हा एकदा मराठी चित्रपट क्षेत्राने सर्वत्र प्रचंड वाहवा मिळवली. याच पार्श्वभूमीवर प्रसिद्ध दिग्दर्शक प्रविण तरडे (Pravin Tarde)  यांचा बहुचर्चित ‘सरसेनापती हंबीरराव‘ (sarsenapati hanbirrao) हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतेच या चित्रपटाचा अंगावर शहारे आणणारा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. ट्रेलर पाहून आता सगळ्यांना हा चित्रपट पाहण्याची उत्सुकता लागली आहे.

‘मुळशी पॅटर्न’ (mulashi pattern) चित्रपटाचे प्रसिद्ध दिग्दर्शक प्रविण तरडे यांच्या ‘सरसेनापती हंंबीरराव’ या चित्रपटाची अनेक महिने चर्चा सुरू होती. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा पोस्टर आणि टीजर देखील प्रदर्शित झाला होता. चित्रपटाचा टिझर याआधीच प्रदर्शित झाला असून त्यामध्ये प्रविण तरडे यांनी साकारलेल्या प्रमुख भूमिकेमधील त्यांचा लूक खूपच दमदार दिसत आहे. तेव्हापासून या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखेची प्रेक्षक वाट पाहत होते. त्यांचा हा चित्रपट येत्या २७ मे रोजी प्रदर्शित होणार आहे.

चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये आपण पाहू शकतो की, प्रवीण तरडे यांचा खतरनाक लूक दिसत आहे. ‘परिस्थिती जेवढी बिकट, मराठा तेवढाच तिखट’ या ओळीने त्यांनी सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्यामुळे आता सगळेजण चित्रपटगृहात जाऊन चित्रपट पाहण्यासाठी खूप उत्सुक आहेत.

हंबीरराव मोहिते हे छत्रपती शिवाजी राजे भोसले आणि संभाजी राजे भोसले या दोन्ही छत्रपतींच्या काळात सरसेनापती हा बहुमान मिळवलेले एकमेव शुरसेनानी होते. त्याचबरोबर ते महाराणी सोयराराणी साहेब यांचे बंधु होते. हिंदवी स्वराज्य स्थापनेच्या लढ्यात जिद्दिने लढा देणाऱ्या आणि आपले अतुलनीय शौर्य दाखवणारे सेनापती म्हणून हंबीरराव मोहिते यांचे नाव घेतले जाते. चित्रपटात प्रविण तरडे यांनी ही मुख्य भूमिका साकारली आहे. या चित्रपटाची आता जगभरातील शिवप्रेमींना उत्सुकता लागली आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

हे देखील वाचा