×

प्रवीण तरडे यांच्या ‘सरसेनापती हंबीरराव’ चित्रपटात स्नेहल तरडे दिसणार ‘या’ महत्वाच्या भूमिकेत

सध्या मनोरंजनविश्वात ऐतिहासिक चित्रपटांचे वारे वाहत आहे. इतिहासातील विविध महत्वाच्या घटनांना चित्रपटाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोचवण्याचे काम अनेक दिग्दर्शक, निर्माते करत आहेत. नुकताच छत्रपती शिवाजी महाराजांचे शौर्य दाखवणारा शेर शिवराज सिनेमा प्रदर्शित झाला. आता लवकरच अभिनेते आणि दिग्दर्शक प्रवीण तरडे यांचा ‘सरसेनापती हंबीरराव’ हा भव्य सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. काही दिवसांपूर्वीच सिनेमाचा जबरदस्त टिझर प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. आता या सिनेमातील एक नवीन पोस्टर प्रदर्शित झाले असून, यामध्ये सरसेनापती हंबीरराव यांच्या पत्नीची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रींच्या नावावरून पडदा उठवण्यात आला आहे.

अभिनेत्री स्नेहल तरडे या ‘सौ. लक्ष्मीबाई हंबीरराव मोहिते’ यांची भूमिका साकारणार आहे. छत्रपती ताराराणी यांच्या मातोश्री आणि सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या पत्नीची महत्वाची भूमिका स्नेहल निभावणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज या दोन छत्रपतींच्या काळात स्वराज्याचे सरसेनापती होण्याचा सन्मान मिळालेले एकमेव सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची व्यक्तिरेखा स्वतः प्रविण तरडे साकारणार आहेत. या सिनेमाच्या माध्यमातून खऱ्या आयुष्यात एकमेकांचे जीवनसोबती असणारे प्रविण तरडे आणि स्नेहल तरडे हे मोठ्या पडद्यावर देखील एकमेकांच्या सोबत पाहायला मिळणार आहेत.

View this post on Instagram

A post shared by Pravin Vitthal Tarde (@pravinvitthaltarde)

स्नेहल यांच्याबद्दल सांगायचे झाल्यास त्या प्रवीण तरडे यांच्या पत्नी तर आहेच सोबतच त्या एक उत्कृष्ट अभिनेत्री आणि संवाद लेखिका देखील आहे. त्यांनी अतिशय मनाच्या समजल्या जाणाऱ्या पुरुषोत्तम करंडकमध्ये देखील सहभाग घेत पारितोषिक पटकावले आहे. रंगमंच्यासोबतच त्यांनी ‘अभिमान’ आणि ‘तुझं माझं जमेना’ या मालिकांमध्ये तर ‘शाळा’, ‘चिंटू’, ‘चिंटू २’, ‘देऊळ बंद’, ‘मुळशी पॅटर्न’ या चित्रपटांमध्ये काम केले आहे.

याशिवाय स्नेहल यांनी अनेक काळ पोलीस खात्यात सेवा केली आहे. मराठीत प्रदर्शित झालेल्या ‘बाहुबली’ आणि ‘बाहुबली २’ या चित्रपटाचे मराठी संवाद लेखन स्नेहल यांनीच केले. भाषेची आवड असणाऱ्या स्नेहल यांनी मराठी बरोबरच फ्रेंच आणि संस्कृत भाषेचे शिक्षण घेतले आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

Latest Post