Saturday, January 25, 2025
Home बॉलीवूड सलमान खानचा ‘हा’ सिनेमा आहे मराठीतील ‘मुळशी पॅटर्न’चा हिंदी रिमेक; ट्रेलर नुकताच झालाय रिलीझ

सलमान खानचा ‘हा’ सिनेमा आहे मराठीतील ‘मुळशी पॅटर्न’चा हिंदी रिमेक; ट्रेलर नुकताच झालाय रिलीझ

‘भाईजान’ सलमान खानच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे. सलमान आणि त्याचा मेहुणा आयुष शर्मा यांचा बहुप्रतिक्षित ‘अंतिम: द फायनल ट्रूथ’ या चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. सलमान खान या चित्रपटात एका शीख पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत झळकणार आहे. दुसरीकडे आयुष एका कुख्यात गुंडाच्या भूमिकेत दिसेल. सलमान आणि आयुष एकत्र चित्रपटात काम करण्याची ही पहिलीच वेळ आहे. यापूर्वी आयुष हा ‘लव्हयात्री’ या चित्रपटात झळकला होता.

ट्रेलरबद्दल बोलायचं झालं, तर ‘अंतिम: द फायनल ट्रूथ’ चित्रपटाच्या या ट्रेलरमध्ये आयुष आणि सलमानमध्ये ऍक्शन सीन पाहायला मिळत आहे. सोबतच दोघेही एकापेक्षा एक डायलॉग बोलताना दिसत आहेत. अशाच एका डायलॉगमध्ये आयुष सलमानला म्हणतो की, “तुला माहिती आहे का? आपण पुण्याचा नवीन भाई आहे.” याला प्रत्युत्तर देत सलमान म्हणतो की, “तू पुण्याचा भाई आहेस. मी आधीपासूनच संपूर्ण हिंदुस्तानचा भाई आहे.” (Actor Salman Khan And Ayush Sharma Face Off With Each Other In Antim The Final Truth Trailer)

‘अंतिम: द फायनल ट्रूथ’ हा चित्रपट ‘मुळशी पॅटर्न’ या मराठी चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अभिनेते आणि चित्रपट निर्माते महेश मांजरेकरांनी केले आहे. महेश मांजरेकर म्हणतात की, त्यांनी आयुष शर्माचा मागील ‘लव्ह यात्री’ हा चित्रपट जाणूनबुझून पाहिला नव्हता. कारण, त्यांना अभिनेत्याबाबत कोणताही दृष्टिकोन त्यांच्या मनात बनावा असे वाटत नव्हते.

दुसरीकडे मांजरेकरांनी असेही म्हटले की, त्यांना वाटले होते की, आयुषसोबत काम करताना त्यांना जास्त मेहनत घ्यावी लागेल. मात्र, तसे काही घडले नाही.

सलमान खानचा ‘अंतिम: द फायनल ट्रूथ’ हा चित्रपट पुढील महिन्यात म्हणजेच २६ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. सलमान खानबाबत बोलायचं झालं, तर तो शेवटचा ‘राधे: योर मोस्ट वाँटेड भाई’ या चित्रपटात झळकला होता.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-जॉन अब्राहमच्या ‘सत्यमेव जयते २’ चित्रपटाचे पोस्टर रिलीझ, प्रदर्शनाची तारीखही जाहीर

-श्वास रोखून धरा! अक्षयचा ‘सूर्यवंशी’ चित्रपट ‘या’ दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला, पोस्टर रिलीझ

-दिशा परमार आणि राहुल वैद्य यांनी साजरी केली पहिली करवा चौथ, पारंपरिक वेशभूषेत दिशाने वेधले लक्ष

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा